सावखेडातील जवान शहीद मगलसिंग परदेशी यांच्या अंत्यसंस्काराची जयंत तयारी

0
9

पाचोरा, प्रतिनिधी । पठाणकोट येथे झालेल्या एका हल्ल्यात सावखेडा बुद्रूक ता.पाचोरा येथील रहिवासी असलेले जवान मंगलसिंग जयसिंग परदेशी (३५) हे शहीद झाले. शनिवारी रात्री ही घटना घडली. दरम्यान, जवान शहीद झाल्याचे कळताच परिसरातील गावांमध्ये शोककळा पसरली आहे.

शहिद मंगलसिंग हे ३९ – ई.एम.ई. मध्ये नायक पदावर कार्यरत होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण सावखेडा बुद्रूक जि. प.शाळेत तर वरखेडी विद्यालयात १० वी पर्यंतचे शिक्षण झाले. वयाच्या १८ वया वर्षीच ते सैन्यदलात भरती झाले.

सेवापूर्तीला एक वर्ष बाकी असतांनाच त्यांना वीर मरण आले. पंधरा दिवसांपूर्वीच सावखेडा येथून सुटी घालवून कर्तव्यावर हजर झाले हेाते. मंगलसिंग यांच्या पश्चात आई – वडील, दोन मोठे भाऊ, पत्नी, दोन मुली व मुलगा आहे. मोठे भाऊ अनिल व देवीलाल हे शेती करतात सोबत पिठाची गिरणी चालवून उपजिवीका चालवतात. मुलगा शहीद झाल्याचे त्यांच्या वडिलांना सांगण्यात आलेले होते.काल रात्री शहीद जवान मगलसिंग परदेशी याचे पार्थिव महाराष्ट्र राज्यात विमानातून मुबई येथे आणले असून आज सकाळी १० वा पाचोरा तालुक्यात सावखेडा बुदुर्ख आणले जाणार असून शासकीय निमनुसार अंत्यसंस्कार केले जाणार आहे.या जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खा उन्मेष पाटील आ किशोर पाटील माजी आ दिलीप वाघ पोलीस अधीक्षक डॉ मुडे पोलीस उपअधीक्षक काकडे सह सर्व पोलीस अधिकारी उपस्थित राहणार आहे गावात फुल रांगोळीच्या सजावटी करून ठीक ठिकाणी मगलसिंग परदेशी अमर रहेचे बॅनर लावण्यात आले आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here