साखरपुड्यासाठी गेले आणि लग्न लावून आले

0
2

कजगाव, प्रतिनिधी । कजगाव येथील रहिवासी व फळ व्यापारी शेख सम्मद शेख इस्माईल मनियार यांचे द्वितीय चिरंजीव अवेश सम्मद मनियार यांचा विवाह दिनांक 11/2/2022 शुक्रवारी रोजी ता, जिल्हा , वाशीम येथील कैसर अहमद सर यांची कन्या उंम्मे जवेरीया यांच्याशी ठरला परंपरेप्रमाणे मनियार परिवार हे वासिम येथेल साखरपुड्यासाठी गेले , दोनी कडील मंडळींनी व परिवारातील सदस्य यांनी साखरपुड्यात विवाह आटोपण्याचा निर्णय घेतला , कजगाव येथील आवेश शेख समद मनीयार त्यांनी मोठे पणा दाखवत विवाहाचा पायंडा मोडत काही न घेता व इतर खर्चाला लगाम घालत निकाह करत अनाठायी खर्चला फाटा दिला, व धर्मगुरूंना बोलावून समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे दोघांचे लग्नगाठ बांधत लग्न लावून मुस्लिम समाजात आदर्श निर्माण केला , मुस्लिम समाजातील पहीला निकाह असा झाल्याने सर्वांनीच आनंद व्यक्त केला , व दोघ परिवारांनी या निर्णयाचे स्वागत करत विवाह करण्याचे ठरविले या निर्णयाला समाजातील इतर जेष्ठ व नातेवाईकांनी पाठिंबा दर्शविला मुस्लिम समाजात विवाह होणाऱ्या खर्चाला बगल देत हा विवाह करण्यात आला या विवाहासाठी दोघे कुटुंबातील व्यक्ती तसेच मनियार कुटुंबातील हाजी शफी शेख इस्माईल मनियार , शेख शाकीर मनियार, सम्मद मनियार, मुस्ताक मनियार , डॉक्टर फारुख , युनूस हाजी अहेमद मनीयार ,शेख असिफ मनियार , सादिक मनियार , शहीद मनियार ,अनिस मनियार , वसीम मनियार, फारुख मनियार , व मूलीकडून नांदेड जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष अहमद अब्दुल गनी , मोहम्मद सुलतान मोहम्मद इस्माईल अर्धापूर नांदेड , नगरसेवक शेख मुनीर भाई वाशिम , शेख जमील भाई शेगाव व मनोहर पंचकमिटी वाशिम यांच्या नेतृत्वाखाली सदर विवाह सोहळा संपन्न झाला ,सर्व मनियार परिवारातील सदस्य उपस्थित होते
मुस्लिम समाजातील अशाप्रकारे होणाऱ्या व उरुळी परंपरेला फाटा देणाऱ्या विवाहाचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे मुस्लिम समाजा सोबत इतर समाजाने ही अशा प्रकारच्या खर्चाला फाटा देणाऱ्या आदर्श विवाहाचे अनुकरण करण्याची काळाची गरज आहे या विवाहाचे कजगाव व परिसरातून कौतुक होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here