जळगाव, प्रतिनिधी । समस्त बारी पंच मंडळ जळगाव यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न व नूतन कार्यकारिणी जाहीर आज दिनांक ०२ रविवार रोजी सालाबादप्रमाणे समस्त बारी पंच जळगाव यांची वार्षिक सर्वसाधारण सभा समाजाचे जोशी पेठ येथील बारी समाज हितवर्धिनी हॉल याठिकाणी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुन करण्यात आले.
सभेची सुरुवात समाजाचे आद्य संत रुपलाल महाराज यांचे प्रतिमा पूजनाने झाली. सभेस गत वर्षात समाजातील ज्ञात-अज्ञात दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रस्तावना मंडळाचे सहसचिव मयुर बारी यांनी मांडली. तर सभेचे मागील वर्षाचे अहवाल वाचन मंडळाचे खजिनदार बालमुकुंद बारी यांनी केले. सभेत मागील आर्थिक वर्षातील कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला तसेच पुढील वर्षात आगामी कार्यक्रमाची रूपरेषा सर्वानुमते ठरविण्यात आली.
राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली. सभेत सन २०२२-२३ साठी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. ती पुढीलप्रमाणे विजय बारी (अध्यक्ष) अरुण बारी (उपाध्यक्ष) हर्षल बारी (सचिव) महेंद्र बारी (उपसचिव) बालमुकुंद बारी (खजिनदार) लतीश बारी (सहखजिनदार) नितीन बारी (प्रसिद्धीप्रमुख) मयूर बारी (सहप्रसिद्धीप्रमुख) सुनील बारी (सदस्य) विजय बारी (सदस्य) राहुल बारी (सदस्य) राजेंद्र बारी (सदस्य) तसेच कार्यकारणी विस्तार कामी समाज बांधवांना सदस्य नोंदणीचे आवाहन समस्त बारी पंच मंडळ जळगाव यांनी केले आहे. तरी इच्छुक समाजबांधवांनी मंडळाशी संपर्क साधावा सभेचे आभार प्रदर्शन मंडळाचे नवनिर्वाचित सहसचिव श्री महेंद्र बारी यांनी केले. सदरप्रसंगी समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमासाठी समस्त बारी पंच कार्यकारीणी यांनी परिश्रम घेतले.