जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री नामदार एकनाथ रावजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना व युवासेना तसेच गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने महाआरोग्य शिबिराचे येथील महाश्वेरी मंगल कार्यालयात मध्ये आज सकाळी दहा वाजताआयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात डोळ्याचे तपासणी हृदयरोग तपासणी नाक कान घसा तपासणी तसेच इतर आरोग्य वर सुद्धा तपासणी करण्यात आली या शिबिरात येथील 239 नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला आहे या शिबिराचे उद्घाटन जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता पी रामानंद यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरासाठी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे सचिव सतीश काशीद शेंदुर्णी नगरपंचायत चे मुख्याधिकारी सादिक पिंजारी शिवसेना प्रसिद्धीप्रमुख तथापत्रकार गणेश पांढरे जामनेर शिवसेना शहर प्रमुख अतुल सोनवणे न्यानेश्वर जंजाळ भरत पवार विनोद नाईक श्रीकांत काबरा डॉक्टर देवानंद कुलकर्णी वीरेंद्र पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून महा आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या शिबिरात गोदावरी फाउंडेशन चे डॉक्टर यांनी या शिबिरात आपल्या सहकार्या सहित लाभार्थ्यांची तपासणी केली.
शिबिर यशस्वीतेसाठी शिवसेना उपतालुका प्रमुख डॉक्टर सुनील अग्रवाल शहर प्रमुख भैय्या गुजर युवा सेना शहर प्रमुख अजय भोई विलास बारी अशोक बारी युवराज बारी बारकू जाधव सुनील बारी अभिषेक पाटील अरुण गवळी तुकाराम पाटील अशोक गुजर राजू पाटील गोदावरी फाउंडेशन जनसंपर्क अधिकारी आशिष शेजवळ यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुनील गुजर तर आभार रवींद्र गुजर यांनी मानले यावेळी शेंदुर्णी येथील नागरिक तसेच शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते