जळगाव : प्रतिनिधी
येथील शिवसेना महानगरतर्फे रिक्षाचालक बांधवांसाठी पांडे डेअरी चौकात मदत कक्ष स्थापन करण्यात आला असून केंद्राचे उद्घाटनमहापौर जयश्री महाजन, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देशमुख, माजी महापौर नितिन लढ्ढा, शिवसैनिक विराज कावडीया यांच्या हस्ते करण्यात आले. हे मदत केंद्र २५ मेपासून ५ जून पर्यत सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.
यावेळी माजी महापौर विष्णू भंगाळे, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, नगरसेवक प्रशांत नाईक, नितिन बरडे, अनंत जोशी, गणेश सोनवणे, मनोज चौधरी, शिवसेना महिला महानगर प्रमुख शोभा चौधरी, शिवसैनिक विराज कावडीया, जितेंद्र छाजेड, प्रकाश कावडीया उपस्थित होते.
राज्य शासनाने पंधरा दिवसांसाठी लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे दुर्बल घटकांना रोजीरोटीचा ही प्रश्न निर्माण झाला आहे. यावर दिलासा देताना २५ ते ५ जून पर्यंत शहरातील परमीटधारक रिक्षाचालक बांधवांना ऑनलाईन अर्ज या ठिकाणी भरून देण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील ७ लाख १५ हजार परमिटधारक रिक्षा चालकांना लॉकडाऊच्या पार्श्वभूमीवर अर्थसहाय्य म्हणून १ हजार ५०० रूपये घोषीत करण्यात आले आहे. सदर रक्कम परमिटधारक रिक्षाचालकांच्या बँक खात्यात जमा होणार असून यासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. यासाठी आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, लायसन्स, बॅच, रिक्षा परवाना इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे. शिवसेना मदत कक्षाला वेलकम सायबर कॅफे यांचे सहकार्य लाभत आहे.
या शासकीय योजनेचा जास्तीत जास्त रिक्षा चालक बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवसैनिक तथा युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडीया यांनी केले आहे.
यशस्वीतेसाठी शिवसैनिक अमित जगताप, उमाकांत जाधव, प्रितम शिंदे, अर्जून भारूळे, गोकूळ बारी, पियुष हसवाल, गणेश भोई, राहूल चव्हाण, अमोल गोपाल, संकेत छाजेड, दिपक नेटके, अशफाख शेख, संदिप सुर्यवंशी, नवल गोपाल, मनोज चव्हाण, विपिन कावडीया आदी परिश्रम घेत आहेत.