शिरसोली येथील कु. किरण चौधरी हिची उच्च शिक्षणासाठी इटली येथे निवड

0
2

जळगाव, प्रतिनिधी । शिरसोली येथील हेमंतकुमार (राजुभाऊ) चौधरी यांची कन्या कु. किरण हेमंतकुमार चौधरी हिने बीई मॅकेनिकल इंजिनीयरिंग जीआरई परीक्षेत ३५० गुण मिळवून तिची एम. एस (मास्टर ऑफ सायन्स) साठी इटली येथील जगप्रसिद्ध विद्यापीठ “जेनोवा” येथे निवड झाली. यानिमित्त तिचा सत्कार व अभिनंदनाचा कार्यक्रम शिरसोली येथे आयोजित करण्यात आला होता.

यानिमित्त आप्तेष्ठ, नातेवाईक, परिसरातील ज्येष्ठ नागरिक व गावकऱ्यांनी कु. किरण चा सत्कार केला व तिला भावी उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. कु. किरण ची उच्च शिक्षणासाठी इटली येथे निवड झाली. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे मत सत्कार करतेवेळी मराठा – कुणबी समाजभूषण पुरस्कार प्राप्त ,गौरी उद्योग समूह, वावडदाचे चेअरमन तथा जळगाव खान्देश कुणबी मराठा वधुवर ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष बापुसाहेब सुमित पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी सिरसोली येथील पंचायत समिती माजी सभापती नंदु पाटील, सरपंच बापु रावसाहेब पाटील, माजी सरपंच अनिल पाटील, माजी सरपंच प्रनय माळी, हाॅटेल धनश्रीचे संचालक निलेश बारी, प्रमोद मिस्तरी, आंबा सोनार, प्रकाश जगताप, सुभाष सोनगिरे, विवेकानंद इग्लिश मिडीयम स्कुलचे विजय पाटील आदी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here