Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»शिक्षक भरती घोटाळा, आतापर्यंत ३०० बनावट प्रमाणपत्र जप्त
    राज्य

    शिक्षक भरती घोटाळा, आतापर्यंत ३०० बनावट प्रमाणपत्र जप्त

    saimat teamBy saimat teamFebruary 10, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे, वृत्तसंस्था । महाराष्ट्र परीक्षांच्या भरती घोटाळ्यात पुरता अडकून गेला आहे. म्हाडा भरती घोटाळा, आरोग्य भरती घोटाळा आणि सर्वात मोठा घोटाळा तो म्हणजे शिक्षक भरती घोटाळा. या शिक्षक भरती घोटाळ्यात आतापर्यंत 300 बनावट प्रमाणपत्र जप्त करण्यात आली आहेत.

    शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात आरोपींनी उमेदवारांना पोस्टानं पाठवलेली तीनशे बनावट प्रमाणपत्र पोलिसांनी हस्तगत केली आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 7 हजार 900 जणांना पात्र केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून सविस्तर अहवाल तयार करुन सरकारला सादर केला आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. यामुळे आता बोगस शिक्षकांची जेलची हवा पक्की झाली आहे.

    बोगस 7 हजार 900 शिक्षकांंची यादी पत्त्यांसह तयार करण्यात आली आहे. ही यादी पडताळणीसाठी शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आली आहे. आता पुणे पोलिसांकडून लवकरच कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. टीईटी घोटाळा प्रकरणात खळबळजनक माहिती उघड झाली आहे. बोगस 7,900 शिक्षकांची पत्त्यांसह यादी तयार झाली आहे. अपात्र उमेदवारांविरुद्ध कारवाईसाठी पुणे सायबर पोलीस तयार आहेत. अपात्र उमेदवारांच्या मूळ गुणांमध्ये वाढ करुन पास केले गेले.

    दरम्यान, आता आणखी एक घोटाळा पुढे आला आहे. पोलीस भरतीत मोठा घोटाळा झाल्याचं उघडकीस आले आहे. पोलीस भरतीत बनावट उमेदवारांचा शिरकाव झाला आहे. तब्बल 3 लाख रुपये मोजून परीक्षेला डमी उमेदवार बसवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. त्यापेक्षाही धक्कादायक म्हणजे पोलीस भरतीत पास होण्यासाठी तब्बल 3 लाख रुपयेही मोजल्याचे समोर आले आहे. डमी उमेदवारांमागे औरंगाबाद कनेक्शन असून, मुख्य सूत्रधाराचा शोध घेतला जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    SC Holiday Verdict : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय: धार्मिक सणासाठी सार्वजनिक सुट्टीची मागणी करता येणार नाही

    March 26, 2026

    Narendra Modi On War : पश्चिम आशियातील युद्धावर भारताची संतुलित भूमिका; लोकसभेत पंतप्रधान मोदींचे स्पष्ट विधान

    March 23, 2026

    Maharashtra Weather : महाराष्ट्रावर दुहेरी हवामान संकट; 5 जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट, 5 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

    March 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.