शहीद विभूती ढौंढियाल यांच्या पत्नी निकिता झाल्या लेफ्टनंट

0
16

शहीद मेजर विभूती ढौंढियाल यांच्या पत्नी निकिता ढौंढियाल (Nikita Dhandhiyal) सैन्यदलात भरती झाल्या. विभूती शहीद झाल्यानंतर निकिता यांनी जिद्दीने सैन्यदलात जाण्याचा निर्णय घेतला होता. सैन्यदलातील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आज त्यांची लेफ्टनंटपदावर (Lieutenant) नियुक्ती करण्यात आली आहे.

देहरादूनमधील मेजर विभूती ढौंढियाला २०१९ मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले होते. पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निकिता यांनी सैन्यदलात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली होती.इलाहाबादमधून वूमेन एँट्री स्कीमअंतर्गत परीक्षा दिली. त्या उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकाडमीतूनत त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आज त्यांची सैन्यदलात निवड करण्यात आली.

मेजर विभूती शंकर ढौंढियाल यांना मरणोत्तर शौर्यचक्र प्रदान करण्यात आले आहे. आज त्यांना सर्वोत्कृष्ट श्रद्धांजली देत त्यांची पत्नी निकिता कौल यांनी सैन्यदलाची वर्दी परिधान केली याचा आम्हाला अभिमान वाटत आहे. सैन्य कमांडर लेफ्टनंट वाय. के. जोशी यांनी त्यांच्या खांद्यावर स्टार लावलेत, असे ट्वीट पीआरओ उधमपूर यांनी केले आहे.

मेजर विभूती यांचे निकितासोबत १८ एप्रिल २०१८ ला लग्न झाले होते. अवघ्या दहा महिन्यानंतर मेजर विभूती यांना वीरमरण आले. विभूती यांचे लहानपणापासूनच सैन्यदलात जाण्याचे स्वप्न होते. सातव्या इयत्तेत असल्यापासून ते प्रयत्न करत होते. त्यांना तेव्हा यश आले नाही. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. २०१२ साली प्रशिक्षण पूर्ण करत ते सैन्यदलात सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here