जामनेर, प्रतिनिधी । तालुक्यातील तोंडापुर येथील नवोदित अभिनेता विशाल गवळी याचं एक अहिराणी गाण्याचं चित्रीकरण ढालखीची धार या निसर्गरम्य परिसरात, नुकतच पार पडले असून या गाण्यत विशाल गवळी नावाचा तरुण मुख्य भुमिकेत दिसणार आहे. विशाल सोबत, रिया चित्ते आणि विशाल बोरसे हे दोन नामांकित चेहरे सुद्धा या गाण्यात पहायला मिळणार आहेत, या गाण्याचे गीतकार खानदेशातील सुप्रसिद्ध गीतकार ज्यांची गाणे आख्या खांदेशभर पोहचले आहेत असे नामांकित गीतकार कंपोझर प्रा रत्नाकर कोळी सर असून दिग्दर्शक म्हणून देखील त्यांनीच काम पाहिले आहे.
गाण्याचे गायक बेवफा साॅंग किंग अशोक कोळी असून नरेंद्र गायकवाड यांनी संगीत दिले आहे व आर के म्युझिक स्टुडिओ जळगाव येथे या गाण्याचे रेकॉर्डिंग झाले आहे, या गाण्याचे चित्रीकरण मच्थिंद्र शार्दुल यांनी केले. असून व्हिडीओ इडीटर म्हणून खांदेश तथा महाराष्ट्र सुपरस्टार सचिन भाऊ कुमावत यांनी काम पाहिले आहे,तर पोस्टर डिझाईन सागर महाजन यांनी केले आहे तसेच करण गायकवाड, अजय दांडगे, निवृत्ती इंगळे ,ज्ञानेश्वर निकम, पवन वाघ, विशाल दांडगे,कृष्णा गुरव,बंटी भदाने, राधे भाऊ, अंबदास मोरे ,असलम तडवी, अजय महाले, प्रताप पाटील, विशाल भोई, विकास खरात, कैलास गवळी,संदीप जाधव इ सहकारी मित्रमंडळी व तोंडापुर ग्रामस्थ ता जामनेर जि जळगाव आणि तरुन मित्रांची मोलाची साथ लाभलेली आहे, एकुणच काय तर सर्व सुपरस्टार लोकांच्या सुपरस्टार कामगीरीतून निर्मित झालेलं गाणं नक्कीच सुपरहिट होणार आहे म्हणून आताच सर्व रसिक वाचक मित्रांनो विशाल गवळी म्युझिक या यु टयुब चॅनल ला सबस्क्राईब करुन ठेवावे जेणेकरून चांगले चांगले खांदेशी गाण्यांची मेजवानी आपणास मिळणार आहे.
साँन्ग 26 सप्टेंबर ला आपलोड झाल आहे तरी सर्वानी विशाल गवळी म्युझिक या YouTube चँनल ला जाऊन एकदा आवर्जून बघावे अस़ आवाहन चॅनल टीमच्या वतीने करण्यात आले आहे.