विम्याच्या रकमेतील तफावत रक्कम नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना द्यावी

0
4

रावेर : प्रतिनिधी
रावेर, मुक्ताईनगर तालुक्यातील केळी बागांचे वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. निकषात बदल केल्याने गेल्या वर्षापेक्षा या वर्षी केळी फळ पीक विम्याची मिळणारी मदत सरकारने कमी केली आहे.त्यामुळे या दोन वर्षात विम्याच्या रक्कमेत २६ हजार रुपयांची हेक्टरी तफावत आहे. ही रक्कम शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना द्यावी अशी मागणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केली आहे.
या संदर्भात मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री, कृषी मंत्री , मदत व पुनर्वसन मंत्री यांची भेट घेऊन मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुक्ताईनगर आणि रावेर या दोन्ही तालुक्यातील केळी बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. केळी फळ पीक विम्याच्या निकषात यावर्षी बदल केल्याने त्याचा लाभ शेतकर्‍यांना फारसा होणार नाही. मात्र गत वर्षी व यंदाच्या मिळणार्‍या आर्थिक भरपाईच्या रक्कमेत २६ हजारांची हेक्टरी तफावत असल्याने यापूर्वी हा विषय राज्य सरकार पुढे आलेला होता. त्यावेळी शेतकर्‍यांना तफावतीची रक्कम राज्य सरकार देईल असे सांगितले होते. विमाधारक नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकर्‍यांना ही रक्कम शासनाने द्यावी. तसेच जिओ टागिंग ऐवजी कृषी व महसूल विभागाने केलेले नुकसानीचे पंचनामे गृहीत धरण्यात यावे असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here