वावडदा एल. एच. पाटील इंग्लिश स्कूलमध्ये १५ वर्षावरील विद्यार्थ्यांना लसीकरण

0
2

जळगाव, प्रतिनिधी । वावडदा येथील एल.एच.पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये जळके आरोग्य उपकेंद्र अंतर्गत १५ वर्षावरील ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली.

यावेळी या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दादासो एल.एच.पाटील यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या लसीकरण केंद्रावर आरोग्य सेवक सलीम भाऊ पिंजारी,ए.सी.पाटील, श्रीमती सुनिता सपकाळे व आशा वर्कर्स सरीता पाटील व जयश्री पाटील ही जळके आरोग्य उपकेंद्राचे सर्व सहकारी उपस्थित होते तसेच मुख्याध्यापक सौ.जयश्री पाटील यांच्या सोबत शाळेतील शिक्षक दिपक सराफ,स्वाती, योगेश चव्हाण व शाळेचे लिपिक महेंद्र पाटील,भरत पाटील तसेच संदिप पाटील हि सर्व शाळेतील कर्मचारी लसीकरण केंद्रावर उपस्थित होते लसीकरण यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिपाई प्रमोद मोरे,विजय पवार, संतोष वाघ,असलम मण्यार व रामचंद्र चव्हाण यांनी सहकार्य केले. या शाळेत ९वी व १०वीचे एकुण ६८ विद्यार्थ्यांना लस देण्यात आली यात १७ विद्यार्थ्यांनी व ५१ विद्यार्थ्यांनचा समावेश आहे शाळेतील लसीकरण केंद्रावर कोरोनाचे सर्व नियमांचे काटेकोर पालन करून लसीकरण करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here