वाढदिवसाला शुभेच्छा नकोत…कोविडग्रस्तांसाठी मदत हवी!

0
4

पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर
जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांचा २८ एप्रिल रोजी येणारा वाढदिवस ते कोरोनाच्या आपत्तीमुळे साजरा करणार नसून कुणीही आपल्याला शुभेच्छा देण्याऐवजी कोरोनाग्रस्तांची मदत करण्याचे आवाहन त्यांनी आपल्या समर्थकांना केले आहे.
याबाबत वृत्त असे की, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव तथा पाळधी गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांचा २८ एप्रिल रोजी वाढदिवस येत आहे. यानिमित्त त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना कोणत्याही प्रकारे कार्यक्रमांचे आयोजन, फलक वा जाहिराती आदींना मज्जाव केला आहे. सध्या सुरू असणार्‍या आपत्तीमुळे कुणी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठीसुध्दा येऊ नये असे त्यांनी सूचित केले आहे.जर कुणाला काही करायचे असेल तर कोरोनाग्रस्तांसाठी मदत करण्याचे त्यांनी सूचित केले आहे. या अनुषंगाने रक्तदान शिबिर, कोरोनाग्रस्त वा त्यांच्या आप्तांना मदत आदी उपक्रम हाती घ्यावेत असे आवाहन त्यांनी केले आहे.
प्रतापराव पाटील यांनी गुलाबरावजी पाटील फाऊंडेशनच्या माध्यमातून लोकसहभागातून पाळधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भव्य कोविड केअर सेंटर सुरू केले असून ते परिसरातील कोविडग्रस्तांना वरदान ठरले आहे. येथे ऑक्सीजन बेडची व्यवस्था करण्यात आली असून येथून आजवर १२० पेक्षा जास्त रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या वाढदिवसाला त्यांनी सगळे कार्यक्रम रद्द केले असून ते फक्त फोनच्या माध्यमातून शुभेच्छा स्वीकारणार असून दिवसभर कोविडग्रस्तांची सेवा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here