वाघूर धरण पुन्हा वाघूर बांधकाम विभागाकडे वर्ग होण्याची चिन्हे?

0
2

यावल : तालुका प्रतिनिधी
वाघुर धरण व डावे व उजवे कालवे साधारणतः तात्कालीन प्रभारी मुख्य अभियंता मोरे यांच्या आदेशाने कडा कार्यालयाकडे अंतर्गत जळगाव पाटबंधारे विभाग अंतर्गत पाटबंधारे उपविभाग यावल व चोपडा यांच्याकडे हस्तांतरण करण्याचे प्रयत्न केले गेले परंतु सद्यस्थितीचे कार्यकारी संचालक व मुख्य अभियंता स्वामी यांनी केलेले हस्तांतरण पूर्णतः चुकीचे असून वाघुर धरण व कालवे यांचे संपूर्ण कामे करून तसेच कम्प्लिशन रिपोर्ट झाल्यावर सिंचनक्षमता निर्माण झाल्यावर हस्तांतरण करून घेणे आवश्यक होते. याबाबत दोन्ही विभात सदर आदेशाची प्रतीक्षा लागुन आहे.
सदर वाघुर धरणाचे व कालव्याचे हस्तांतरण शासन निर्णय व वेळोवेळी शासनाच्या निर्णयाच्या अधीन राहून अधीक्षक अभियंता यांच्या दोघांच्या म्हणजे बांधकाम विभाग व व्यवस्थापन विभाग यांच्या स्वाक्षरीने हस्तांतरण करणे आवश्यक आहे व होते, त्यामुळे स्वामी यांनी सांगितले की, आजही वाघुर विभागाकडून धरण व कालव्याची कामे प्रगतीपथावर असून बरीचशी कामे अपूर्ण आहेत ती पूर्ण झाल्यानंतर शासन नियमानुसार वाघुर धरणाचे भविष्यात हस्तांतरण करता येईल त्यामुळे सद्यस्थितीत वाघुर धरणाचे व कालव्याची प्रगतीपथावरील कामे व व्यवस्थापन हे वाघुर बांधकाम विभागाकडे राहील याबाबत अधीक्षक अभियंता जळगाव मध्यम प्रकल्प मंडळ जळगाव याची यांनी नोंद घ्यावी असे आदेशात नमूद होण्याची शक्यता आहे.
आजही वाघूर धरणातून डाव्या कालव्यातून टेस्टिंगसाठी पाणी सोडण्यात येत आहे. डावे व उजवे कालवे पूर्णतःअपूर्ण आहेत, त्यामुळे सिंचन क्षमता निर्माण झालेली नाही, व शेतकरी पाणी उपलब्ध असूनही, शेतीसाठी घेऊ शकत नाही परिणामी सिंचन क्षेत्र भिजत नाही व शासनाची नियमानुसार पाणीपट्टी ही मिळत नाही ही फार मोठी व आत्मचिंतनाची बाब आहे. वाघुर धरणाचे व कालव्याची संपूर्ण कामे झाल्यावरच शासन निर्णयानुसार अधीक्षक अभियंता यांच्या स्वाक्षरीने भविष्यात हस्तांतरण करावेत असे स्पष्ट आदेश कार्यकारी संचालक व मुख्य अभियंता स्वामी यांनी काढावेत असे तापी पाटबंधारे विभागात बोलले जात आहे.
वाघुर धरण देखभाल-दुरुस्ती व नियंत्रण हे यावल व चोपडा पाटबंधारे उपविभाग यांच्याकडे जबाबदारी देण्यासंदर्भात आदेशित करण्यात आले होते मात्र या विभागामध्ये मनुष्यबळ कमी असून आणि या विभागात देखरेखीसाठी अधिकार्‍यांना पंच्याहत्तर किलोमीटरचा लांबीचा प्रवास करणे हे दूर पडत आहेत.व देखरेखीसाठी महत्त्वाच्या वेळी अधिकार्‍यांना याठिकाणी येणे लांब अंतराचे पडते वाघुर कालव्याच्या देखरेखीसाठी कामकाज पाहणे अवघड आहे येथील अधिकार्‍यांनी वरिष्ठांकडे यासंदर्भात पत्रव्यवहारही केलेला होता काही महिन्यांपूर्वी वाघुर धरण कार्यक्षेत्रातून सामानाची चोरी झाली होती या संदर्भात नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करावा लागला होता शासनाच्या मालमत्तेची चोरी झाल्याची उघड झाली होती यापुढे वाघुर धरण व कालव्याचे सर्व व्यवस्थापन वाघुर बांधकाम विभागाने नियमित देखभाल करावी यापुढे या वाघुर प्रकल्पास कडा कार्यालयाचा कोणताही संबंध राहणार नाही व सर्वस्वी जबाबदारी कार्यकारी अभियंता वाघुर धरण बांधकाम विभागाचे आहे असे वरिष्ठांनी आदेश काढण्यासाठी हालचालींना वेग आला आहे.
यावल चोपडा पाटबंधारे उपविभागात या आधीच मनुष्यबळ कमी आहे आता यावल चोपडा पाटबंधारे उपविभागाच्या वरील कामाचा ताण कमी होईल व त्यांच्या विभागात त्यांना पावसाळ्यापूर्वी चे काम करण्यासाठी सहकार्य लाभणार असल्याचे समजते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here