जळगाव । तालुक्यातील जळगाव खुर्द शिवारामधील वाघुर नदीतून विनापरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाविरुद्व नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाघूर नदीपात्रात काही ट्रॅक्टर चालक हे विनापरवाना वाळूची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती नशिराबाद पोलिसांना मिळाली. त्यानुसार नशिराबाद पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी ७ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता वाघुर नदी पात्रात धडक कारवाई करत एक विनानंबरचे ट्रॅक्टर पकडले. ट्रक्टर नशिराबाद पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश तुकाराम गायकवाड यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक जनार्दन तंटू कोळी (वय 58 रा. कोळीवाडा गोंबी, ता. भुसावळ जि. जळगाव) याच्याविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल महाजन करीत आहे.