वाकोद येथे चाकूचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार

0
2

पहुर. ता.जामनेर, प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या वाकोद येथील ३५वर्षीय महिलेवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार केल्याची घटना आज दि.३१रोजी रात्री१वाजेच्या सुमारास वाकोद येथे घडली. याप्रकरणी पहुर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी स अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी ३५वर्षी य महिलेने पहुर पोलिसात दिलेल्या फिर्यादी त म्हटले आहे की, वाकोद येथील लच राममंदिर जवळ राहणारा गणेश भगवान मोहिते(वय३२)हा आज दि.३१रोजी रात्री १वाजेच्या सुमारास मी झोपेत असतांना माझ्या घराच्या स्वंयपाक खोलिच्या खिडकीतून चोरटा प्रवेश करून आला.व मला झोपेतून उठवून चाकूचा धाक दाखवून खिडकीतून बाहेर खेचून मारहाण करून गालावर चावा घेतला. माझ्या शेजारील गजानन काळे यांच्या बांधकाम सुरू असलेल्या पहिल्या रुम मध्ये जबरदस्ततीने नेऊन शारिरीक अत्याचार केला.म्हणून आरोपी गणेश मोहिते याच्या विरुद्ध पहुर पोलिस ठाण्यात भाग ५ गुन्हा र.नं४९५/२०२१भांदवि कलम ३७६,३५४,४५२,३२३,अनुसूचित जाती व जमाती कायदा अधिनियम३(१)(डब्ल्यू)(१),(११)अन्वये दाखल करण्यात आला आहे. आरोपी स तात्काळ अटक करण्यात आली आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अरुण धनवडे व त्यांचे सहकारी पोहेकाँ.भरत लिंगायत, पो.काँ.विनय सानप, ईश्वर देशमुख, नवल हटकर, गोपाल माळी आदींंनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ गुन्हा दाखल केला व आरोपी स अटक केली. घटनेची माहिती मिळताच पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे यांनी ही भेट दिली.तपास स्वतः डीवायएसपी भारत काकडे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here