वाकोदजवळ आयशरला मोटार सायकल आडवी लावून रस्ता लूट; दोन मोबाईल हिसकावले

0
3

पहुर. ता. जामनेर, प्रतिनिधी । जळगाव-औरंगाबाद या राज्य महामार्गावर वाकोद जवळ वाघुर नदीच्या पूलाचे जवळ एक पल्सर मोटारसायकल आयशर या मालवाहतूक करणाऱ्या गाडीला आडवी लावून सुमारे १६ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल हिसकावल्याची घटना काल दि.३०रोजी रात्री ८.२० वाजेच्या सुमारास घडली.

वाकोद आणि फर्दापूर या सिमेदरम्यान वाघुर नदी असून नदिवर पूलाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाकोद हद्दीत रस्त्यावर खोदकाम केले आहे. त्यामुळे याठिकाणी वाहनांची गती हळू होते. याचा फायदा उचलून एका विनानंबरच्या पल्सर मोटरसायकलवरील तीन अनोळखी ईसमांनी एका मालवाहतूक करणाऱ्या आयशर गाडी ला पल्सर मोटारसायकल आडवी लावून चालक मुकेश रमेश सोलंकी रा.काबरी ता.भगवान पूरा जि.खरगोन(म.प्र.)ह.मु.भाग्यश्री पाँलिमर्स उमाळा जळगाव याच्या जवळून विवो कंपनीचा १५,५००रूपये किमतीचा तसेच क्लिनर याच्या जवळील जीओ कंपनीचा ५००रूपये किमतीचा मोबाईल जबरीने हिसकावून घेतला.दोन्ही बाजूंनी समोरून वाहने येत असल्याचे पाहून चोरट्यांनी पळ काढला. ही बातमी कळताच भितीने वाहनांची पळापळ झाली.घटनेची माहिती कळताच पहुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे, पो.काँ.विनय सानप, गोपाल माळी, नवल हटकर, ज्ञानेश्वर ढाकरे, ईश्वर देशमुख,तसेच फर्दापूर येथील सहा. पोलिस निरीक्षक अमोल मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींच्या शोधार्थ संपूर्ण परिसर पिंजून काढला.
दरम्यान आयशर चालक मुकेश सोलंकी याच्या फिर्यादीवरून अज्ञात तीन जणांविरुद्ध गु.र.नं.४९४/२०२१भांदवि कलम ३९२,३४१प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी पाचोरा विभाग भारत काकडे यांनी ही घटनास्थळी भेट दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here