वाकडी.ता.जामनेर, प्रतिनिधी । वाकडी येथे आज दसऱ्याचे मूहूर्त साधून पहूर येथील पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, वाकडी येथे अवैध धंदे हे मोठ्या प्रमाणात चालू असून कुठे तरी हे बंद होवावे, यासाठी गावातील अनेक नागरिकांची इच्छा होती, कारण गावात बसस्थानकावरच खुले पध्दतीने गावठी,दारू आणि इंग्लिश दारू विक्री होते, सकाळी अनेक विद्यार्थ्यांनी शाळेत जातात. यावेळी अनेक तरुण बसस्थानकावरच दारू पिऊन पडले असतात, यामुळे गावातील अनेक महिला व विद्यार्थी बसस्थानकावर येत नाही, यांना कुठे तरी पोलीस प्रशासनाकडून तंबी असावी, यासाठी गावात पोलीस चौकीचे प्रारंभ केला,
यावेळी वाकडी येथील ग्रामपंचायत यांनी वेळोवेळी दारू बंदीच्या ठराव देऊन ही दारू ही सरच पणे चालू आहे,सट्टा,पत्ता याकडे अनेक तरुण पिढी जाताना दिसत आहे, यामुळे गावात पोलीस चौकी असावी,असा निर्णय सरपंच पती अनिल गायकवाड यांनी घेतला, यावेळी, माजी सरपंच अशोक भोळावद यांनी चौकीसाठी पाच हजार देणगी दिली, त्यानंतर सरपंच अनिल गायकवाड यांनी पाच हजार रु.दिले, सामाजिक कार्यकर्ते संजय दांडगे यांनी पाच हजार रुपये दिले, पहूर पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी देखील चौकीसाठी पाच हजार रुपये याची मदत केली, जेणेकरून वाकडी येथील अवैध धंदे बंद होतील , यावेळी ग्रा.पं.सदस्य शब्बीर तडवी, प्रवीण गायकवाड, विशाल राजपूत,इंडीयन टेलर, पोलीस, घनश्याम पाटील, उपसरपंच एस.के.सुरवाडे, ग्रामपंचायत सदस्य रमेश गायकवाड,आदी उपस्थित होते.