लोंढरी येथे कापूस मोजणीत फसवणूक न झाल्याचे अखेर आले समोर

0
24
भुसावळात आढळला एक नवीन रुग्ण; संख्या चारवरून पाचवर

जामनेर, प्रतिनिधी । तालुक्यातील लोंढरी या गावात कापसाच्या मोजणीत फसवणूक झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर फेसबुक, Whatsapp च्या माध्यमातून व्हायरल झालेल्या होत्या. यावेळी साईमत लाइव्यच्या हाती सत्य घटना काय ही माहिती आली आहे.

तसेच लोंढरी या गावात शेतकऱ्यांच्या कापसाची मोजणीत फसवणूक झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या, यावेळी आमच्या सायदैनिक साईमत च्या हाती लागलेल्या माहितीनुसार लोंढरी गावातील नामदेव राठोड या शेतकऱ्याने व्यापारी अंकित पाटील यांना कापूस आठ हजार १०० रु च्या भावाने दिला असता, त्यांनी अचानक त्यातील एक ४० किलो तोलाचे माप केले असता त्यांना काही शंका आल्या होत्या, परंतु कापुस वजनामध्ये काहीच फरक न पडल्याने तरी देखील त्यांनी आणि शेतकरी बांधवांनी मापारी व व्यापारी अंकित पाटील या दोघांना पोलीस पाटील यांना कळविले त्यानंतर पहूर पोलिस स्टेशनला कळविले असता पहूर पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन शेतकरी व व्यापारी यांना विचारपूस करून, कापसाची एका आयशर गाडीचा तोल काटा केले असता ,त्या गाडीमध्ये असलेल्या कापसाचे वजन करुन घेतले, त्यानंतर शेतकऱ्यांनी दिलेल्या कापसाची माहिती घेऊन त्या आयशर गाडी मध्ये कुठल्याही प्रकारची फसवणूक नसल्याचे स्पष्ट झाले, त्यावेळी नामदेव राठोड या शेतकऱ्याच्या लक्षात आले की कापसामध्ये कुठल्याही प्रकारची फसवणूक झालेली नाही असे समजताच त्या शेतकऱ्यांनी अंकित पाटील या व्यापाऱ्यांशी माफी मागितली, तसेच पहुर पोलीस स्टेशनला मापारी व्यापारी यांच्याविषयी कुठल्याही प्रकारचा अर्ज दाखल केला नाही,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here