लेवा सखी घे भरारी ग्रुपतर्फे ‘कळी उमलताना’वर चर्चासत्र

0
9

जळगाव ः प्रतिनिधी
लेवा सखी घे भरारी जळगाव ग्रुपतर्फे मंगळवारी ‘कळी उमलताना’ या विषयावर ऑनलाईन चर्चासत्र झाले. यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रुपाली बेंडाळे यांनी किशोरवयीन मुलींना वाढत्या वयातील बदल, समस्या आदींवर मार्गदर्शन करून त्यांच्या समस्यांचे निराकरण केले.
मुलींनी लाजेस्तव कोणालाही विचारू शकत नाहीत, अशा प्रकारचे प्रश्‍न आयोजकांकडे पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते. ते प्रश्‍न कार्यक्रमाचे दरम्यान डॉक्टरांना विचारले.
स्त्रीसुलभ समस्यांवर योग्य उपाय, नकळत झालेल्या चुकांचे आरोग्य, मानसिकता,आयुष्यावर होणारे दूरगामी परिणाम, अजाण वयात कोणावर विश्‍वास ठेवावा. शारीरिक बदलाला कसे सामोरे जावे, अशा अनेक समस्यांचे निराकरण करण्यात आले.यशस्वीतेसाठी डॉ.भारती वसंत ढाके, डॉ. नीलम विनोद किनगे, सविता अनिल भोळे, डॉ. स्मिता पाटील यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here