लेवा पंचायतीतर्फे परिचयपुस्तिकेत नोंदणीचे आवाहन;

0
3

भुसावळ : प्रतिनिधी
भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे, भुसावळ विभागतर्फे पुनर्विवाहोत्सुक घटस्फोटित, विधवा, विधूर तसेच प्रौढ, अपंग, शेतकरी आणि व्यावसायिक युवक, युवतींची परिचय पुस्तिका तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या वर्षीचे पुस्तिका निर्मितीचे सलग नववे वर्ष आहे. परिचय पुस्तिकेक विवाहेच्छुकांनी विनामूल्य नावनोंदणी करावी, असे आवाहन प्रकल्प प्रमुख आरती चौधरी यांनी केले आहे.
पाडळसे येथील भोरगाव लेवा पंचायत ही संस्था अनेक वर्षांपासून समाज बांधवांसाठी सामाजिक, कौटुंबिक, विवाह विषयक तंटे या बाबत योग्य मार्गदर्शन करत आली आहे. लेवा पाटीदार समाजातील विवाहोत्सुक वधु-वरांचे परिचय संमेलन भुसावळात होणार आहे. समाजातील इच्छुकांनी विनामूल्य नाव नोंदणीसाठी पुरुषोत्तम मेडिकल, मामा पाचपांडे पान सेंटर, किंवा जामनेर रोडवरील भोरगाव लेवा पंचायत कार्यालयात नोंदणी करावी.
समुपदेशन कक्षाच्या अध्यक्षा आरती चौधरी यांनी पुढाकार घेतला आहे. समाजातील घटस्फोटीत, विधवा व अंपगांचे विवाह जुळण्यास अडचणी येतात. त्यासाठी भोरगाव लेवा पाटीदार पंचायतीच्या माध्यमातून असे विवाह जुळवून आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. लवकरच पुस्तिका तयार केली जाणार असून, समाजातील पुर्नविवाहोत्सुकांसाठी परिचय मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वुभूमीवर यंदा हा परिचय मेळावा लांबला आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यावर याबाबत बैठक होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here