लसीकरणासाठी एस.टी. कर्मचार्‍यांची फरफट

0
3

जळगाव : प्रतिनिधी
कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचे आदेश केंद्र व राज्य सरकारने दिले आहे. त्यानुसार जळगाव जिल्हा एस.टी. डेपो व्यवस्थापकांनी आपल्या कर्मचार्‍यांना लसीकरणाबाबत पत्र जारी केले होते. मात्र कर्मचारी शहरातील लसीकरण केंद्रावर गेल्यावर त्यांना तुम्हाला आम्ही लस देवू शकत नाही, असे सांगून परतविले. दरम्यान, कर्मचार्‍यांनी याबाबत जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली असता याबाबत कारवाई करण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, एस.टी. कर्मचारी आपातकालीन परिस्थितीत आपले कर्तव्य चोख बजावत आहे. त्यामुळे शासनाने एस.टी. कर्मचार्‍यांना लसीकरणाबाबत निर्देश जारी केले आहे. यावरुन एसटी मंडळाच्या संबंधित विभागाने आपल्या वाहक व चालक कर्मचार्‍यांना लसीकरणासंबंधात अधिकृत पत्र दिले होते. या पत्राच्या आधारे कर्मचारी जिल्हा सामान्य रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या लसीकरण
केंद्रावर लसीकरणासाठी गेले असता त्या सर्वच ठिकाणी या कर्मचार्‍यांना लस देण्याबाबत नाकारण्यात आले. याविषयी कर्मचार्‍यांनी विचारले असता, आम्हाला एसटी कर्मचार्‍यांसंदर्भात लसीकरणाचे आदेश नाही, असे सांगण्यात आले. यावरुन कर्मचार्‍यांनी आपले गार्‍हाणे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांच्याकडे मांडले. जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित बाबीची चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी एसटी कर्मचारी संघटनेचे गणेश पाटील, आर.के. पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here