रोटरॅक्ट क्लब जळगाव च्या माध्यमातून शिवकालीन शिवजयंती साजरी करण्यात आली.

0
14

जळगाव प्रतिनिधी 
शहरातील शिवाजी महाराज पुतळ्या जवळ कोर्ट चौकात एक भव्य बॅनर लावण्यात (३२×१५) आले होते त्यावर महाराजांचे आयुष्य चित्र स्वरूपात उभे करण्यात आले होते त्याला संपूर्ण बुरुजाचा देखावा देण्यात आला होता.
मावळे, सरदार, पेशवे, भालदार, अशी पोशाख घातलेले सदस्य त्या वेळी उपस्थित होते.
शिवतीर्थ मैदानावरून पायी मिरवणूक काढून महाराजांची पितळी मूर्ती हातात घेत जिल्ह्याचे पालक मंत्री गुलबराव पाटील,महापौर जयश्रीताई महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील,शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी मंत्री गुलाबराव देवकर,पोलीस उपनिरिक्षक कुमार चिंथा,पीपल्स बँकेचे चेअरमन अनिकेत पाटील, माजी चेअरमन तथा संचालक भालचंद्र पाटील आदींची उपस्थिती होती..
शिवाजी महाराजांना मानवंदना देत मुजरा करण्यात आला व आरती पूजन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शिवचरित्राचे गाढे अभ्यासक तथा शिवशाहीर दादा नेवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिवजयंती साजरी करण्यात आली.
रोटरॅक्ट च्या माध्यमातून शिवकाळ उभा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महाराजांना वंदन करत शाहिरी पोवड्याने करण्यात आली.
शाहीर संग्राम जोशी व संदीप जोशी यांनी या प्रसंगी महाराजांवरील पोवाडा सादर केला.
रोटरॅक्ट च्या माध्यमातून क्लब चे माजी अध्यक्ष जयवर्धन नेवे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन घडवून आणले.
पंकज जैन,तरुण अर्तानी, निरंजन देशमुख, जयवर्धन नेवे, देवयानी रसाळ, नितीन नेवे, कृणाल सोनार, प्रा.राजेंद्र देशमुख, लक्ष्मीकांत अडावदकर, स्वप्नील नेवे, सुरेश नेवे,चिन्मय जहागीरदार, विनोद नेवे,संजय कोरके,अजय नेवे, नवीन दलाल, भिकू झवर,जगदीश नेवे आदींनी आपला सहभाग नोंदविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here