रोटरी ईस्टतर्फे बालसुधारगृहात आरोग्य तपासणी व परळ वाटप

0
6

जळगाव : प्रतिनिधी
शहरातील बाल सुधारगृहातील मुली-महिलांसाठी आरोग्य तपासणी व मार्गदर्शनाचा स्तुत्य उपक्रम रविवारी येथील रोटरी क्लब ऑफ ईस्टच्या वर्धापनदिनानिमित्त घेण्यात आला. या कार्यक्रमात त्वचा व डोळ्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी ३५ महिलांना याचा लाभ झाला.
त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अमेय कोतकर यांनी मुली व महिलांचे त्वचेच्या संदर्भातील तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केले. तर नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. पंकज शाह यांनी डोळ्यांची तपासणी करून या कोरोनाच्या काळात डोळ्यांची निगा कशी राखावी याची माहिती दिली. मास्कचे वितरण करण्यात आले. बालसुधारगृहाच्या अधीक्षक जयश्री पाटील, जळगाव जनता बँकेचे उपाध्यक्ष डॉ. प्रताप जाधव, प्रोजेक्ट चेअरमन मनीषा पाटील, अध्यक्ष भावेश शाह, उपाध्यक्ष वीरेंद्र छाजेड उपस्थित होते.
या वेळी पक्ष्यांना पाणी मिळावे म्हणुन परळचे वाटप करण्यात आले. तसेच गरजू मुली व महिलांना औषधी व चष्म्याचे विनामूल्य वाटप करण्यात आले. यासाठी वैद्यकीय समिती प्रमुख डॉ राहुल भन्साली, स्वप्निल जाखेटे, दीपेन शाह, सचिन जेठवानी, गोविंद वर्मा, संजय गांधी, वर्धमान भंडारी, संजय शाह व रोटरी क्लब ऑफ ईस्टचे पदाधिकारी, सदस्य यांचे विशेष सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here