जळगाव : प्रतिनिधी
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाऊंटट ऑफ इंडियाच्या जळगाव सी.ए. विद्यार्थी शाखेस सन २०२०-२१ या वर्षामध्ये केलेल्या विशेष कामगिरीबद्दल राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट शाखा म्हणून तृतीय पुरस्कार आणि थखठउ ेष खउ-ख स्तरावरील उत्कृष्ट शाखा म्हणून द्वितीय पुरस्कार
प्राप्त झाल्याचे जळगाव सी. ए. विद्यार्थी शाखेचे वर्ष २०२०-२१ चे अध्यक्ष सी.ए. सौरभ सुभाष लोढा यांनी घोषित केले.
सदर पुरस्कार दि. ९ फेब्रुवारी २०२१ रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या ७१व्या वार्षिक सोहळ्यात जळगाव सी. ए. विद्यार्थी शाखेला देण्यात आला. नवी दिल्ली आय.सी.ए.आय. चे मा. अध्यक्ष सी.ए. अतुल गुप्ता यांच्या हस्ते जळगाव सी.ए. विद्यार्थी शाखेस हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी नवी दिल्ली आय.सी.ए.आय. चे माजी अध्यक्ष सी.ए. प्रफुल्ल छाजेड, सी.ए. चंद्रशेखर चितळे आणि श्री.राकेश सेहेगल हे उपस्थित होते.
वर्ष २०२०-२१ मध्ये सी.ए. सौरभ लोढा यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव सी.ए. विद्यार्थी शाखेने वर्षभर शैक्षणिकदृष्ट्या विशेष उपक्रम राबविले आहे. तसेच सी.ए. करणार्या विद्यार्थ्यांसाठी विविध तज्ञांची व्याख्याने, ऑनलाइन वेबिनार, ऑनलाइन कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. आरोग्य तपासणी शिबिर, योगा प्रशिक्षण, वृक्षारोपण असे विविध उपक्रम राबविले आहेत. त्याच प्रमाणे स्वच्छता मोहीम, गरिबांना अन्नदान, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि निरीक्षण गृहामध्ये असणार्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, ग्रामीण भागातील मुलांसाठी ऑनलाइन करिअर कौन्सिलिंग कार्यक्रम आयोजित केले आहेत. या सर्व चांगल्या उपक्रमांचा परिणाम म्हणून जळगाव सी. ए. विद्यार्थी शाखेचा राष्ट्रीय आणि थखठउ ेष खउ-ख स्तरावर गौरव करण्यात आला आहे.
सी.ए. सौरभ लोढा यांनी या पुरस्काराबद्दल सर्व जळगाव सी.ए. शाखेतील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच हा सन्मान मिळवण्यासाठी जळगाव सी.ए. विद्यार्थी शाखेचे व्यवस्थापन समिती सदस्य तसेच जळगाव सी.ए. शाखेचे व्यवस्थापन समिती सदस्य सी.ए. सागर पाटणी, सी.ए. प्रशांत अग्रवाल, सी.ए. विकी बिर्ला आणि सी.ए. स्मिता बाफना यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे असे मनोगत जळगाव सी.ए. विद्यार्थी शाखेचे सन २०२०-२१ चे अध्यक्ष सी.ए. सौरभ लोढा यांनी व्यक्त केले.