राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

0
22

जळगाव : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे 17 मे रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. विविध कार्यक्रमांना त्या उपस्थिती देतील. पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशीही त्या संवाद साधणार आहेत.

उद्या सकाळी 9.30 वाजता चार्टर्ड अकाउंटंट संघटनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटर व यशस्विनी सामाजिक अभियानाच्या बैठकीला हजेरी लावतील. दुपारी पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर 3.30 वाजता जळगाव ग्रामीण व शहरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर सायंकाळी मुक्ताईनगर येथे श्री संत मुक्ताबाई समाधी स्थळाचे व संस्थानच्या नवीन मंदिराचे दर्शन घेणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here