रावेर पोलिसात अवैध धंद्यावाल्यांना सन्मानपूर्वक वागणूक

0
9
भुसावळात आढळला एक नवीन रुग्ण; संख्या चारवरून पाचवर

रावेर, तालुका प्रतिनिधी । महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवरती असणाऱ्या रावेर शहरात अवैध धंद्यांचा भस्मासूर बोकाळला आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे कायद्याचे रक्षण करणारे पोलिसच अवैध धंद्यांना व त्यांच्या चालकांना खुलेआम पाठबळ देत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पोलिस निरीक्षकच नवीन सट्टा पिढी, पत्त्यांचे क्लब यांना अधिकृत स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या मध्यस्थीने परवानगी देत असल्याने रावेर शहर व तालुक्याची वाटचाल अंधारमय होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असणारे पोलिस निरीक्षकच आपल्या आर्थिक फायद्यासाठी चहा व पानटपरीसारखे अवैध धंदेवाल्यांना दुकाने थाटण्यासाठी लाखोचा मलिदा घेऊन परवानगी देत असल्याचे सदर चर्चा सुरू असून त्यामुळे त्यांच्या कर्तबगारीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी या प्रकरणी विशेष लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली असून तशी मागणी जोर धरू लागली आहे.
नुकतेच  मध्यप्रदेशातून कोट्यवधी रुपयांची ब्राऊन शुगर घेऊन जळगाव जिल्ह्यात टॅक्सीने आलेल्या बऱ्हाणपूर येथील महिलेस जळगाव   पोलिसांनी रावेर येथे ताब्यात  घेतले. जळगाव पोलिस कारवाई करतात, मग रावेर पोलिसांचे काय? असाही प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहे.शहरासह रावेर पोलिस स्थानकाच्या हद्दीत सट्टा पत्ता, अवैध दारू, अवैध वहातूकदारांकडून दरमहा हप्तावसुली, खाजगी नाममात्र भांडणातून पैसे उकळणे यासह अनेक बाबींच्या तक्रारी रावेर पोलिस निरीक्षकांच्या विरूध्द असतांनाही जिल्हा अधिक्षक त्यांच्यावर मेहरबान का? असाही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. जिल्हा अधिक्षकांनी न्याय प्रिय भूमिका घेत रावेर शहरासह तालुक्यातील अवैध धंद्यावाल्यांवर कठोर कारवाई करीत अवैध धंद्यांचा कायमचा न्यायमोड करावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here