रावेर पंचायत समितीच्या शाखा अभियंत्यांचा भोंगळ कारभार !

0
14
भुसावळात आढळला एक नवीन रुग्ण; संख्या चारवरून पाचवर

रावेर, प्रतिनिधी । केंद्रबिंदू म्हणून पंचायत समितीकडे पाहिले जाते. रावेर पं. सं मध्ये कार्यरत असलेले बांधकाम विभागाचे शाखा अभियंत्यांनी भोंगळ कारभार सुरु ठेवला असून पं. सं च्या अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाची गुणवत्ता घसरत असल्याने उपविभागीय अभियंता चंद्रशेखर चोपडेकर यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
पं.स.च्या अंतर्गत बांधकाम विभाग मार्फत केल्या जाणाऱ्या कामाची गुणवत्ता दिवसेंदिवस घसरत आहे.अंदाज पत्रकामध्ये ज्या जागेवर कामे करायची आहेत त्या जागेवर कामे न करता इतरत्र कामे करून त्या कामाची मोजमाप पुस्तिकेत नोंदणी करण्याचा अजब गजब प्रकारही शाखा अभियंत्यांमार्फत खुलेआम केला जात आहे. अनेक कामे न करताच मोजमाप पुस्तिकेत बनावट नोंदणी केली गेली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
डी.आर.महाजन नामक शाखा अभियंता तर स्वतःला कार्यकारी अभियंता असल्याचे भासवून उपविभागीय अभियंत्याला जुमानत नसल्याचेही इतर शाखा अभियंते सांगतात.यासह मोठ्या राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त असल्याचेही संबंधित शाखा अभियंता भासवतो.एकंदरीत त्यांच्या अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचा बट्ट्याबोळ होत असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी उपविभागीय अभियंता चंद्रशेखर चोपडेकर  यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here