जळगाव । रामेश्वर कॉलनीतील विवाहितेने माहेरहून एक लाख रूपये आणावे यासाठी तिचा छळ करणाऱ्या पतीसह पाच जणांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिंचोली (ता.जळगाव) येथील माहेरवासीण गणेश वंजारी यांचा विवाह गणेश संजय लाडवंजारी यांच्याशी झाला. लग्नानंतर दोन महिन्यांनी गणेश लाडवंजारी याने शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. माहेरुण एक लाख रूपये आणण्याची मागणी केली. मात्र, वडील पैसे देवून शकत नसल्याने सासरे, दिर आदींनी विवाहितेचा मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून विवाहिता माहेरी गेली. तिच्या फिर्यादीवरून बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती गणेश लाडवंजारी, सासरे संजय लाडवंजारी, सासू मनीषा संजय लाडवंजारी, दीर संजय लाडवंजारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल गफ्फार तडवी करीत आहेत.