राज्य महिला आयोग अध्यक्ष नियुक्ती ला आघाडी च्या बिघाडी चा ब्रेक

0
4

 

मुंबई – यास्मिन शेख
राज्यातील महिलांच्या प्रश्नावर कार्यक्षम मानल्या जाणाऱ्या महिला आयोगाचे अध्यक्ष पद गेल्या तीन वर्षांपासून रिक्त आहे . या पदावर नियुक्तीवरून आघाडीत बिघाडी होत असल्याची चर्चा आहे .

महिलांना विषयी प्रशांवर सरकार काम करत असले तरी महिला आयोगाची स्थापन एक संविधानिक न्यायची मंडळ म्हणून करण्यात आली आहे  . मात्र गेल्या तीन वर्षांपासून राज्याला महिला आयोग अध्यक्ष मिळालेला नाही. आणि त्यामागील कारण म्हणजे आघाडीतील बिघाडी असल्याचे बोलले जात आहे .

राज्यात तीन पक्षाचे महविकास अगदी सरकार आहे .त्यामुळे प्रत्येक पक्षाला हे पद पाहिजे हा विषय असतोच त्यातच महिला आयोग हे वोट बँक म्हणून वापरले जातRइ पद आहे . कारण महिला आयोग हे महिलांच्या प्रशांवर काम करते त्यातून राज्यातील महिलांमध्ये सरकार ची बाजू खंभीर ठेवण्यास मदत होते. आणि नंतर याच यातून वोट बँक तयार ही केली जाते . मात्र नेहमीच त्या विभागाचा मंत्री ज्या पक्षाचा त्याच पक्षाचा आयोगाध्यक्ष असा एक नियम अलिखित असल्याचे मानले जाते . त्यानुसार राज्याच्या मंत्रिमंडळात महिला व बालविकास मंत्री हे खाते काँग्रेस कडे आहे . त्यामुळे महिला आयोग अध्यक्ष पद ही कौंग्रेस कडे असावे असा कौंग्रेसचा आग्रह आहे. मात्र महिला आयोग अध्यक्ष पद राष्ट्रवादीकौंग्रेस कडे असावा असा मत प्रवाह त्या पक्षाच्या नेत्यांचा आहे . मात्र या वादात तीन वर्षे उलटले निर्णय लागत नाही .म्हणून शिसेनेन महिला आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष घेत या मागणीतून काही दिवसांपूर्वी माघार घेतली आहे . मात्र राष्ट्रवादी चे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे यातून माघार घेण्यास तयार नाहीत . सूत्रांनी मिळलेल्या माहिती नुसार राष्ट्रवादी नेते व अजित पवार हे आपल्या पुण्यातील नेत्या चाकणकार यांच्या साठी आग्रही असून महिला बालविकास मंत्री या साठी तैयार नाहीत आघाडी मधील या बिघडीने महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाची फाईल मंत्रालयात धूळ खात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे . राज्यात महिलांना प्रश्न त्यासाठी महिला आयोग लवकरात लावकर नियुक्त करा ही मागणी विरोधी पक्षा बरोबर महिलांच्या विषयनवर काम करणाऱ्या सामाजिक संस्थांनकडून केली जात आहे मात्र दादा आणि ताई च्या वादात या वर न8रणाय होत नसल्याची माहिती विश्वसनिय  सूत्रांनी दिली आहे .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here