राजकारणाचा काला – ईडी सीडी दही हंडी

0
6
यास्मिन शेख 
मुंबई 
कृष्ण जन्म उत्सव देशभरात वेग वेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी  मुंबईतील दहीहंडी उत्सवा बद्दल चे आकर्षण किंवा उत्सुकता ही नेहमीच सर्वांना असते . मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोना ने थैमान घातले आणि सर्वच सण उत्सव थांबले .
राज्यात कोरोनाच्या पहिल्या ,दुसऱ्या लाटेत लाखो लोकांनी आपला जीव गमावला . आणि तिसरी लाट ही राज्याच्या दारावर उभी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच मागील आठवड्यात केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने राज्याला रात्रीची संचारबंदी लावण्याच्या सूचना केल्या आहेत तर सण उत्सवाचे दिवस असल्याने बाजार पेठेत होणाऱ्या गर्दी बद्दल चिंता व्यक्त केली आहे . अश्यातच दहीं हंडी चे निम्मितं घेत राज्यात राजकारण काला सुरू झाला असून  भाजप नेते सुधीर मुंगूनटीवार यांनी मंदिरे खुली करण्यासाठी मुंबईत आंदोलन केले , तर दहीहंडी साठी मानवी थर लावणाऱ्या आणि मोठ्या संख्येत दही हंडीचे आयोजन करणाऱ्या गोविंदा पाथकांसोबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून हा सण कोरोना मुळे सामाजिक भावनेतून साजरा करण्याचे आव्हाहन केले होते . मात्र अचानक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते , नेते जागे झाले आणि त्यांनी मुंबईत ठीक ठिकाणी दहीहंडी कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले . मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी दही हंडी चे आयोजन करत मनसे नेत्यांनी निर्बंधाची दहीहंडी फोडली. आणि ही दही हंडी फोडणारे गोविंद बनले मनसे नेते बाळ नांदगावकर , कोरोना काळातील केंद्र सरकारच्याया सूचना आणि निर्बंधांचे उल्लंघन करत दहीहंडी साजरी करणारे भाजप आणि मनसे नेत्यांना पोलिसांनी ताब्यात ही घेतले . त्यांच्यावर गुन्हे ही दाखल केले   . राम कदम यांनी राज्यात मोगल सरकार असल्याचे सांगितले तर नेत्याने च्या सभा आणि यात्रा यांच्यावर राज ठाकरे यांनी टीका केली . हे सर्व होत असताना एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे खरोखर हे सर्वजांते साठी होत आहे का ? तर नाही मुंबई महानगरपालिका निवडूनक तोंडावर आल्या आहेत मात्र कोरोना संकट असल्याने या निवडणूक पुढे ठाकल्याण्याची शक्यता आहे तसे झाले तर भाजप आणि मनसे ला परवडणार नाही . त्यामुळे दही हंडी , गणपती उत्सव  या सर्व कार्यक्रमच्या आधार घेत हा राजकारणी काला सुरू झाला आहे . केंद्रात सरकार भाजप चे आहे कोरोना काळात सर्व निर्बंध हे केंद्राच्या सूचनेनुसार लावले जात असून राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता त्यावर उपाय म्हणून निर्बंध शिथिलता केली जात आहे . मात्र जनतेच्या भावाने चा विषय म्हणजे देव आणि सण उत्सव , राजकारणासाठी वर्षानुवर्षे याचा वापर होत आला आहे आणि तोच आज ही होत आहे . कोरोना मध्ये मुस्लिम समाज  सामूहिक नमाज पठाण करत असल्यावर सरकारवर टीका करणारे आज निर्बंध झुगारून दही हंडी साजरी करतात मग यांना काय बोलायचे ? कोरोना काळात  सामूहिक नमाज पठण करणे याला समर्थन नाहीच मात्र  जितके ते चुकीचे होते तितकेच हे चुकीचे नाही का ? मात्र यालाच म्हणतात राजकारण जनतेचं भावनिक विषयांना घेऊन तिळपापड करायचा आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्याची हाच या मागील मत्वाचा उद्देश . ओबीसी आरक्षण , मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण हे मुद्दे तर आहेच मात्र आता   त्यात कोरोना तीळ नियम हा मुद्दा ही एक झाला आहे . खरे म्हणजे मुंबईत गणपती उत्सव, दहीहंडी, नौरात्र उत्सव  हे तरुणाईचे आकर्षण आहे त्यातून राजकीय पक्षांचा प्रचार होत असतो , काही राजकोय पक्ष यातून आपले शक्ती प्रदशन करतात . मतदान फिरवण्यासाठी यातून मदत होते मात्र निर्बंधांमुळे असे करत येत नाही फक्त हे कारण आहे राजकीय काल्या चे त्यातही ईडी मुळे सरकार अडचणीत असले तरी ईडी ची सीडी कशी आणि कोणा मागे लागते हे आता सर्वसामान्य माणसाला ही कळायला लागले आहे . इतकेच नाही तर त्या मागील राजकारण ही सामान्य जनतेला लक्षात येत आहे . त्यामुळे ईडी ची सीडी मतदारांना आकर्षित करू शकणार नाही त्यासाठी जनतेचे भावनिक विषयच घेतले पाहिजे त्यामुळे सण उत्सवात हा राजकारणी काला असाच होत राहील .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here