रविवारी रांगोळी स्पर्धा; 6 लाखांचे बक्षिस मिळवा

0
2

जळगाव : प्रतिनिधी I स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपुर व वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 9 खुल्या राष्ट्रीय रांगोळी स्पर्धा 9 जानेवारी रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत बालगंधर्व खुले नाट्यगृहात आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्यांना राष्ट्रीयस्तरावर सुमारे 6 लाख रुपयांपर्यतची बक्षिसे दिली जाणार असुन, प्रत्येक स्पर्धकास संस्कृती मंत्रालयातर्फे सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

प्रत्येक स्पर्धकास ऑनलाईन नोंदणी आवश्‍यक आहे. यासाठी स्वतः चा मोबाईल सोबत आणावा लागेल. इतर तांत्रिक मदत प्रतिष्ठानकडुन मिळेल. नोंदणी झाल्यावर तीन तासांत रांगोळी (ठिपक्या ठिपक्यांची, संस्कार भरती प्रमाणे, पोट्रेट, गालिचा) पुर्ण करुन रांगोळी काढतानाचा फोटो काढायचा आहे. रांगोळी झाल्यावर रांगोळी सोबतच फेोटो सांस्कृतिक मंत्रालयाच्या वेबसाइटवर अपलोड करायचा आहे.(यासाठी प्रतिष्ठानतर्फे तांत्रिक मदत मिळेल) रांगोळी काढण्यासाठी चार फुट बाय चार फुट चौकोन मिळेल. विविध रंगाच्या रांगोळ्या व इतर वस्तु स्पर्धकाने स्वतः च्या खर्चाने आणायच्या आहेत. स्पर्धेच्या दरम्यान शासनाने कोविड-19 च्या संदर्भातील मार्गदर्शक तत्वानुसार या स्पर्धेचे आयोजन होईल त्यामुळे हात धुवुन, सॅनिटाईज करणे, मास्क वापरणे व सुरक्षित अंतर ठेवणे हे सर्व स्पर्धकांना बंधनकारक राहील, असे वसंतराव चांदोरकर यांनी कळवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here