युवकांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे गुण अंगीकारावे – किरण पाटील

0
5

भुसावळ : प्रतिनिधी
कोरोनाची परिस्थिती पाहता सर्वांनी घरीच राहून छ. संभाजी महाराजांची प्रतिमेचे पुजन करावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी मराठी समाज अध्यक्ष किरण पाटील यांनी प्रतिमा पूजन करताना आणि तरुणांना मार्गदर्शन करताना आपण सगळ्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या गुणांचे आचरण करुन त्यांच्यासारखे आपण व्हावे असे प्रतिपादन या प्रसंगी करण्यात आले.
श्री छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मराठा समाज शहर तालुकातर्फे रेल्वे स्टेशन जवळील भव्य अशा अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा ठेवून प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी प्रमुख माजी नगरसेवक राजेंद्र आवटे उपस्थित होते. यावेळी नाना पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रसंगी छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष कृष्णा शिंदे, योगेश जाधव, रुपेश पाटील, विजय कलापुरे, अविनाश गरुड, प्रमोद पाटील, राजेश शिवपुजे, गौरप जगताप, पंकज हिंगणे, ज्ञानेश्‍वर जगदाळे, पवन कलापुरे, बापू पाटील, राहुल पाटील, हितेश टकले, भुषण पाटील, नमा शर्मा उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here