यावल, प्रतिनिधी । रविवार दि. ६ रोजी डॉ. कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा याकरीता आवश्यक असलेले ई-श्रम कार्डची मोफत नोंदणीचे अभियान पाचवे सत्रात पोहोचले आहे.
तालुक्यातील वड्री ग्रामपंचायत जवळ सदर सत्र घेण्यात आले,निशुल्क ई श्रम कार्ड नोंदणी महाअभियानास पाचव्या टप्यात नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.सदर अभियानात गावातील एकूण346लाभार्थ्यांनी लाभ घेतला.या अभियानाचे उदघाट्न जिल्हा परिषद सदस्या सौ.सविताताई भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी डॉ.कुंदन फेगडे,अतुल भालेराव, अजय भालेराव(सरपंच )पंकज चौधरी(उपसरपंच),भूषण फेगडे, फकिरा तडवी,नबाब तडवी,हाजी शिवरु वजीर,हमीद तडवी,संदिप लोहार,असलम तडवी,संजय पाटील, सतार तडवी,कादिर तडवी गफार तडवी,संजू चौधरी, राजू तडवी,लतेश चौधरी,दर्शन चौधरी,रवींद्र बागुल,सागर चौधरी, शाहरुख तडवी,बाळकृष्ण सुरवाडे,लुकमान तडवी,आदींची उपस्थिती होती.
सदरील अभियानास धिरज भोळे, सागर लोहार,मनोज बारी,विशाल बारी,दिपक फेगडे,हर्षवर्धन मोरे,जयवंत माळी,चेतन कापुरे शुभम सोनवणे यांचे सहकार्य लाभले.