मेहरुण परिसरातील टी.बी.रुग्णालय सुरु करा – संदीप मांडोळे

0
5

जळगाव ः प्रतिनिधी
केंद्र सरकारने कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. याबाबत सावध रहावे व योग्य त्या उपाययोजना कराव्यात असे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने मेहरुण, तांबापूर, रामेश्वर कॉलनी या परिसरातकरिता महापालिकातर्फे जुने टी.बी.रुग्णालय येथे १०० बेड कोविड रुग्णालय तातडीने सुरु करावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित कक्षाचे महानगराध्यक्ष संदीप मांडोळे यांनी महापौर जयश्री महाजन यांच्याकडे केली आहे.
शहरातील मेहरुण परिसरात असलेले टी.बी.रुग्णालय बंद पडलेले रुग्णालय अतिशय मोठे असून जागा निसर्गरम्य परिसरात आहे. तसेच मेहरुण, तांबापूरा, रामेश्वर कॉलनी यांची एकूण लोकसंख्या एक लाखांच्या घरात आहे. महापालिका नियमानुसार या भागाकरिता आधीपासूनचा मनपा संचलित रुग्णालय आवश्यक आहे. कोविड रुग्णालयाचे नंतर नियमित रुग्णालय सुध्दा करता येण्याची मागणी ही निवेदनावरद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर महानगराध्यक्ष संदीप मांडोळे, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश पाटील, विभागीय अध्यक्ष मतीन पटेल, उपमहानगराध्यक्ष इमाम पिंजारी, हर्षल वाणी आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here