मुख्यमंत्री शिंदे उद्या जिल्हा दौऱ्यावर

0
1

जळगाव ः प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या १२ सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी पूर्णत्वाकडे आहे.
ते दि. १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता शासकिय विमानाने मुंबई येथून जळगाव विमानतळावरे आगमन व हॅलिकॉप्टरने मौजे हडसन शिवार हेलीपॅड, ता. पाचोराकडे प्रयाण. दुपारी १२.१५ वा. मौजे हडसन शिवार हेलीपॅड येथे आगमन व मोटारीने एम.एम.कॉलेज मैदान पाचोराकडे प्रयाण. दुपारी १२.३० वा. शासन आपल्या दारी कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ एम.एम.कॉलेज मैदान पाचोरा) दुपारी २.३० वा. मोटारीने मौजे नांद्रा ता. पाचोराकडे प्रयाण. दुपारी २.५० वा. नर्मदा ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट या कंपनीचे उद्घाटन व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) मौजे निंभोरा (नगरदेवळा रेल्वेस्टेशनजवळ), ता. भडगाव व पाचोरा येथे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नविन मुख्य इमारत बांधकामाचे ई-भूमिपूजन (स्थळ- नांद्रा ता. पाचोरा, जि.जळगाव), दुपारी ३.३० वा. मोटारीने मौजे हडसन शिवार हेलीपॅडकडे प्रयाण. दुपारी ३.४५ वा. मौजे हडसन शिवार हेलीपॅड येथे आगमन व हेलीकॉप्टरने जळगाव विमानतळाकडे प्रयाण.दुपारी ४ वा. जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here