मुक्ताईनगर, प्रतिनिधी । मुक्ताईनगर से आमदार चंद्रकांत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत ची माहिती आपल्या सोशल मीडियावर अधिकृत पोस्ट केली आहे. आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आटोपून परतल्यानंतर मुक्ताईनगरचे आमदार आमदार चंद्रकांत पाटील कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरून अधिकृत माहिती दिली. आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. हिवाळी अधिवेशन आटोपून परतत असताना त्यांना रस्त्यातच खोकला, सर्दीचा आणि तापाचा त्रास जाणवू लागला. शुक्रवारी त्यांनी तपासणी केली असता त्यांना कोरोना झाल्याचे लक्षात आले.
गेल्या काही दिवसांत राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून हिवाळी अधिवेशनादरम्यान अनेक राजकीय व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर, मंत्री यशोमती ठाकूर यांनीही कोरोनाची बाधा झाल्याचे त्यांनी ट्विटरवरुन कळवले. आता, आमदार चंद्रकांत पाटील यांनीही कोरोना झाल्याची माहिती दिली आहे.