Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राजकीय»मी पुन्हा येईल, म्हणणाऱ्या मोदींची अवस्था फडणवीसांसारखी होईल
    राजकीय

    मी पुन्हा येईल, म्हणणाऱ्या मोदींची अवस्था फडणवीसांसारखी होईल

    SaimatBy SaimatAugust 16, 2023No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, औरंगाबादः प्रतिनिधी

    देशाचे चित्र मोदी सरकारला अनुकूल दिसत नाही, त्यामुळे मी पुन्हा येईल, असे कितीही सांगितले तरी त्यांची अवस्था देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी होईल, अशी टिका शरद पवार यांनी मोदींवर केली आहे. ते येथे पत्रकारांशी बोलत होते. मी पुन्हा येईन, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून बोलताना व्यक्त केला होता. यावरुन आता शरद पवारांनी टीकास्त्र सोडले आहे.

    मणिपूरजवळ चीन आहे, त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज आहे. घडणाऱ्या सर्व गोष्टी देशाच्या दृष्टीने घातक आहेत, ९० दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. अविश्वास ठरावाच्या दिवशी मणिपूरवर २ मिनिटे बोलले आणि इतर विषयावर २ तास बोलले. प्रधानमंत्र्यांनी मणिपूर मध्ये जाव्ो लोकांना विश्वास द्यावा, हे त्यांना महत्वाचे वाटले नाही. त्यापेक्षा निवडणुकांच्या तयारीची मीिंटग घेणे त्यांना महत्वाचे वाटले. मणिपूरमध्य ेस्त्रियांची िंधड काढली जाते आणि मोदी सरकार पाहत आहे. त्यामुळे जनमत मोदी सरकार विरोधात जात आहे. दिल्ली भाषणात त्यांनी या सगळ्यांचा उल्लेख करण्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन घेऊन मी पुन्हा येईल म्हणाले. आता फडणवीस आले मात्र कसे? ते बघितले. त्यामुळे आता हे पुन्हा कसे येतील बघाव्ो लागेल. असो, आम्ही संघर्ष करू आणि मजबुतीने उभे राहू. जनमत तयार करून यांना धडा शिकवू, असे म्हणत शरद पवारांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. गेल्या काही दिवसांपासून मी राज्यात फिरत आहे. लोक समर्थन करत आहेत, पािंठबा देत आहेत. सांगोल्यात हजारो लोकांनी माझी गाडी अडवली, अनेक ठिकाणी लोक पुढे येत आहेत. समर्थन करत आहेत, आनंद आहे. बीड सभेनंतर काही दिवसांनंतर पुन्हा बाहेर पडणार आहे, असेही पवार म्हणाले.

    चिन्ह गेल्याची चिंता नाही, फक्त सत्ताधरी सत्तेचा गैरवापर योग्य नाही
    देशाची सत्ता ज्यांच्या हातात आहे, त्या भाजप आणि सहकाऱ्यांची भूमिका समाजातून एकवाक्यता संपवण्याची आहे. धर्म, समाजामध्ये विभाजन कसे होईल, कटुता कशी वाढेल ? याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी आम्ही देशपातळीवर २ सभा घेतल्या. ६ राज्याचे मुख्यमंत्री त्यात होते, या व्यासपीठाला आम्ही ‌‘इंडिया‌’ नाव दिले. याच इंडियाची बैठक मुंबईत आहे. मोदी सरकार विरोधात जनमत दाखवणे आणि पर्याय देणे यासाठी हा लढा आहे. समाजात जातीय उन्माद मोदी सरकार वाढवत आहे. घेतलेल्या निर्णयामुळे कटुता वाढत चालली आहे. उदाहरण द्यायचे झाले तर इंग्लिश माध्यमांच्या शाळेत सीबीएसई शाळा कशा चालवायचा? हे केंद्र सरकर ठरवते. नव्या नियमांनुसार १४ ऑगस्ट २०२३ हा दिवस फाळणी दिवस साजरा करावा असे सांगितले. याव्ोळी प्रचंड व्ोदनादायी गोष्टी झाल्या होत्या, कटुता निर्माण झाली होती. मात्र आता हा राग कटुता कमी होत असताना यांनी पुन्हा ते वर काढले आणि फाळणी दिवस साजरा करायला लावला. दोन समाजात कटुता येईल, असे प्रदर्शन ठिकठिकाणी कराव्ो असे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत निषेध करण्याची भूमिका ‌‘इंडिया‌’ घेणार आहे, असे पवार म्हणाले.
    निवडून आलेले सरकार कमजोर करण्याचे काम सुरु आहे. गोवा आणि मध्यप्रदेशमध्ये हे आपण पाहिले आहे. महाराष्ट्रातही आपण हे सगळं पाहिले आहे. प्रस्थापित सरकारला पाडणे हे काम मोदींच्या नेतृत्वात असलेल्या लोकांनी घेतले आहे, असा आरोप याव्ोळी पवारांनी केला. निवडणूक आयोगाने मला नोटीस दिली आहे. यामध्ये चिन्हांबाबत विचारणा केली. त्याचे उत्तर आम्ही देणार आहोत. मला चिन्ह गेल्याची चिंता नाही,फक्त सत्ताधरी सत्तेचा गैरवापर करत आहेत हे योग्य नाही, असेही पवार म्हणाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.