माळी क्लासमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

0
3

यावल, प्रतिनिधी । यावल येथे सोमवार दि.3 रोजी यावल येथील माळी क्लास मधे सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साकळी येथील शारदा विद्या मंदिराचे उपाध्यक्ष सुभाष महाजन उपस्थित होते.त्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले प्रतिमा पुजनानंतर क्लासमधील विद्यार्थिनींनी आपले लक्षवेधी उत्कृष्ट मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात बऱ्याचशा विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत उपस्थित होत्या.त्या वेशभूषेमुळे कार्यक्रमाला एक वेगळेच शोभनीय दृश्य प्राप्त झाले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी साने गुरुजी विद्यालयाच्या शिक्षिका विद्या प्रकाश महाजन यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत पुस्तकाचे वाटप केले तसेच उपस्थित प्रमुख पाहुणे सुभाष महाजन,शारदा विद्या मंदिराचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोकुळ बोरसे सर, राजु माळी सर,मुंबई येथील पी एस आय विजय महाजन,यावल येथील बाल संस्कार विद्या मंदिर मुख्याध्यापक सुनील माळी सर,खान्देश डेअरीचे फार्मचे संचालक प्रकाश महाजन या सर्व मान्यवरांचा सत्कार माळी पंच मंडळातर्फे करण्यात आला उपस्थित असलेल्याना सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे वाटप माळी पंच मंडळा तर्फे करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावल शहर माळी समाज अध्यक्ष रमेश महाजन व समाज बांधवांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here