मामलदे येथे तरूणांनी घेतला अक्षय प्राणवायूसाठी झाडे संवर्धनाचा संकल्प

0
11

चोपडा ः प्रतिनिधी
तालुक्यातील तरूणांनी अक्षय प्राणवायूसाठी वृक्ष संवर्धनाचा मामलदेच्या तरूणाई चा संकल्प दि.१४ मे रोजी खान्देशात अक्षय तृतीया सण म्हणजे शेती पर्वाचा मुहूर्ताचा दिवस हा मुहूर्त साधत मामलदे येथे तरूण मित्रांनी एकत्र येत गतवर्षी सामाजिक वनीकरण चोपडा यांनी रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या रोपांना पाणी देवून संगोपन करत ती जगविण्याचा आज मुहूर्त साधला. अक्षय प्राणवायूसाठी अक्षय तृतीयेच्या या मुहूर्ताचे परिसरात कौतुक झाले.
फाट्यापासून मामलदे गावापर्यंत रोपांना माती लावून पाणी टाकून ही झाडे जगवण्यासाठी तरूणांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर संकल्प केला. दीनानाथ इंगळे, सोहम कोळी, प्रथमेश पाटील, जयदीप पाटील, पवन पाटील, प्रदिप कोळी, हर्षल महाजन, राकेश पाटील, दीपक पाटील, गोपाळ कोळी, सुशिल पाटील, प्रणव पाटील, आशुतोष पाटील, तुषार कोळी, स्वप्निल पाटील, विश्वजीत पाटील यांनी यासाठी श्रमदान केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here