महापौर जयश्री महाजन विशेष आदर्श समाज शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

0
13

जळगाव, प्रतिनिधी । भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव व देवकाई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श समाज शिक्षिका पुरस्कारांचे वितरण नुकतेच झाले. महापौर तथा माध्यमिक शिक्षिका जयश्री सुनिल महाजन यांना विशेष आदर्श समाज शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

महापालिकेत महापौर दालनात साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुस्तक भिशी जिल्हा प्रमुख विजय लुल्हे, देवकाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष सनिल दाभाडे, कुमूद प्रकाशनच्या प्रकाशिका संगीता माळी व मेहरुणच्या जय दुर्गा प्राथमिक विद्यालयाचे उपशिक्षक महेश बच्छाव, सुनिल महाजन, आदर्श शिक्षक सागर झांबरे, महेश तायडे, महापौर यांचे स्वीय सहाय्यक ललित धांडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here