विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
जुन्या पेन्शनसह विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी बुधवारी दि.२३ आणि दि.२४ दोन दिवस राज्यभर दोन दिवसीय संप पुकारण्यात आलेकला आहे.या संपात सहभागी होण्यासाठी मंगळवारी सोयगाव तहसील कार्यालयातील तालुका महसूल संघटनेच्या वतीने तहसीलदार रमेश जसवंत यांना संपाचे निवेदन सादर करण्यात आले आहे.संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद पाटील,उपाध्यक्ष राजेंद्र नारळे यांच्या अध्यक्षतेखाली तालुका महसूल संघटनेच्या वतीने संपाचे निवेदन दिले आहे.
जुन्या पेन्शनचं मागणी सह राज्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या शासन स्तरावरील प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य महसूल कर्मचारी संघटनेने संप पुकारला आहे.त्यामुळे सोयगाव तालुका मह्सुक्ल कर्मचारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष शरद पाटील,उपाध्यक्ष राजेंद्र नारळे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह मंगळवारी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे कि,विविध मागण्यांसाठी नायब तहसीलदार,पदोन्नत अव्वल कारकून,महसूल सहायक,शिपाई आणि कोतवाल आदी कर्मचारी दि.२३ आणि दि.२४ संपावर असल्याबाबत कळविण्यात आले आहे.
Home Uncategorized महसूल कर्मचाऱ्यांचा दोन दिवसीय संप…तालुका महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने दिले निवेदन……