मलकापूर पोलीस कर्मचाऱ्याची गडचिरोलीत ड्युटीवर असतांना डोक्यात गोळी झाडून स्वहत्या 

0
20
मलकापुर – प्रतिनिधी सतीश दांडगे   येथील पोलीस कर्मचाऱ्याने अहेरी पोलीस स्टेशन,जिल्हा गडचिरोली येथे ड्युटीवर असतांना स्वतावर गोळी झाडुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
 बुलडाण्यातील मलकापुर येथील पंतनगर परिसरातील रहिवासी असलेला प्रमोद चांगदेव शेगोकार हा गडचिरोलीतील अहेरी पोलीस स्टेशन येथे पोलीस कर्मचारी पदावर कार्यरत होता.दी. 20 फेब्रुवारी रोजी रात्री 8 च्या सुमारास त्याने ड्युटीवर असतांना स्वतःहाच्या पिस्तुल ने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे,तर त्याच्या आत्महत्येचे कारण अद्यापपर्यंत कळू शकले नसुन अहेरी पोलीस या प्रकरणात अधिक तपास करित आहेत.
         तर प्रमोद चांगदेव शेगोकार हा मुळचा मलकापुर येथील पंतनगर परिसरातील रहिवासी असुन त्याच्या आत्महत्येने संपूर्ण परिसरातील शोककळा पसरली आहे.तर त्यांचेवर उद्या 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 च्या सुमारास त्यांचे मुळ गावी मलकापुर येथे अंतविधी करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here