मनसेला मोठा धक्का ; ‘हा’ बडा नेता ४० पदाधिकाऱ्यांसोबत करणार राष्ट्रवादीत प्रवेश

0
2

एकीकडे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष मजबुतीसाठी  मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) राज्यभरात दौरे करत आहेत. मात्र दुसरीकडे पक्षाला गळती लागल्याचे चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील मनसेच्या नेत्या  रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी पक्षाला रामराम करत  राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केला. आता विदर्भातही मनसेला मोठा धक्का बसणार आहे . मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले (Atul Wandile) राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. विदर्भातील ओबीसीचा मोठा चेहरा म्हणून अतुल वांदिले ओळखले जातात.

 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ते  मुंबईमध्ये राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात 40 पदाधिकाऱ्यासोबत वांदिले राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणार आहेत. वांदिले  यांच्या पक्षप्रवेशाने विदर्भात राष्ट्रवादीची ताकद वाढणार असून याचा पक्षाला मोठा फायदा होईल. इतकेच नाही तर हिंगणघाट तालुक्यातील काही सदस्य ,सरपंचही वांदिले यांच्या सोबत राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here