मनपाच्या आरोग्य यंत्रणेची झोप उडाली खडके चाळीतील सार्वजनिक शौचालयांची तातडीने स्वच्छता

0
3

जळगाव ः प्रतिनिधी । शहरातील खडके चाळीतील सार्वजनिक शौचालय स्वच्छतेचे तीन तेरा या मथळ्याखाली सायंदैनिक साईमतने काल वृत्त प्रकाशित केली.या वृत्ताची  मनपा प्रशासनाने  त्वरीत दखल घेऊन काल सायंकाळी व आज सकाळी या सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता करण्यात  आली आहे. ही कार्यवाही तातडीने होताच  खडके चाळ परिसरातील नागरिकांनी ‘साईमत’ला धन्यवाद  दिले आहे.

शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील खडके चाळ या वस्तीसाठी त्यामागील बाजूला शहर महानगरपालिकेने सार्वजनिक शौचालय बनविले आहे परंतु गेल्या 15 ते 20 दिवसापासून महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांंनी येथे स्वच्छताच केली नाही. त्यामुळे येथे नेहमी येणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते.

याबाबत काही नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांना   ही समस्या कथन केली परंतु स्थानिक नगरसेवक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला  होता.मात्र नगरसेवक व मनपा प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केले  होते.खडकेचाळ परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची गंभीर तक्रार समजल्यानंतर ‘साईमत’ने दखल घेत काल रोजी यासंदर्भात छायाचित्रासह वृत्त प्रकाशित  केले.या वृत्ताची त्वरेने दखल घेत मनपा आरोग्य विभागाने काल सायंकाळी व आज सकाळी सार्वजनिक शौचालय व परिसरात  साफसफाई केली  व पाण्याची फवारणी करुन परिसर स्वच्छ केल्याचे दिसून आले.मनपाने तातडीने दखल घेतल्याबद्दल  या  परिसरातील नागरिकांनी मनपालाही धन्यवाद दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here