भारतीय बॉक्सिंग संघाच्या निवड चाचणीसाठी माहेश्वरी चोपडेची निवड

0
1

जळगाव : प्रतिनिधी

बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया,नॅशनल सेंटर ऑफ एक्ससिल्लेन्स , रोहतक हरियाणा येथे ७-१० नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या भारतीय बॉक्सिंग संघाच्या निवड चाचणीसाठी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने ७०-७५ किलो वजनगटात माहेश्वरी चोपडेची निवड करण्यात आली आहे.आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा खेळण्याची संधी माहेश्वरीला मिळू शकते.
माहेश्वरीला जिल्हास्तरीय खेलो इंडिया बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक निलेश बाविस्कर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल खेळाडू व प्रशिक्षकाचे जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाने, एकलव्य क्रीडा संकुलाचे संचालक व जळगाव शहर बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, उपाध्यक्ष डॉ.अमोल पाटील, सहसचिव नयन राणे,खजिनदार रोहिदास पाटील, रवी नरवाडे, संतोष सुरवाडे, डॉ. सचिन वाणी, डॉ. सारिका वाणी, सुरज नेमाडे, राकेश पाटील, राकेश मु. पाटील, विशाल बाविस्कर, विजय पाटील,विशाल सोनावणे व शारदा पाटिल यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here