भव्य रक्तदान व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

0
6

जळगाव – प्रतिनिधी

कोरोनाचा गंभीरकाळ तसेच बदलत असलेले वातावरण यामुळे सुरळीत रक्तपुरवठा होण्याकरिता सर्वोच्च रक्तपेढ्यांमध्ये अडचणीत तसेच खंड पडत असल्याने गंभीर पीडित, प्रसूती करिता आलेल्या माता-भगिनी, हिमोफिलिया रुग्णांना सतत रक्ताची गरज भासते. याकरिता सामाजिक बांधिलकीतून सेंट्रल रेल्वे मजदूर संघ आयोजित सामाजिक सेवाभावी आरोग्य क्षेत्रात निरपेक्ष कार्य करणारी संस्था मुक्ती फाउंडेशन उपार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान व मोफत आरोग्य शिबिराचे विशेष आयोजन प्रवासी,रेल्वे कर्मचारी, अधिकारी आदीसाठी दिनांक 4 सप्टेंबर 2021 शनिवारी रोजी सकाळी 9.30 वाजता जळगाव रेल्वे स्थानक परिसर जुना उड्डाणपुलाजवळ असलेला रेल्वे सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या सभागृह येथे आयोजित करण्यात आलेले आहे.जळगाव शासकीय रक्तपेढ्या मध्ये मर्यादित साठा असल्याने रक्तदानाचे  संकलनकार्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संचलित जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढी सोपविण्यात आलेले असून आरोग्य शिबिराचा करिता आर.एल. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नेहेते हॉस्पिटलचे अस्थिरोग  तज्ञ डॉक्टर योगेंद्र नेहेते , पंचम कॅन्सर हॉस्पिटल चे कॅन्सर तज्ञ डॉक्टर अतुल भारंबे जीवन ,ज्योती व्यसनमुक्ती केंद्राचे डॉक्टर बाळासाहेब कुमावत यांचे सहकार्य लाभणार असून रक्तदान व आरोग्य शिबीरकरिता आदरणीय गुलाबपाटील, सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सीआरएमएस चे मंडल अध्यक्ष एस.के. समाधीया,  मंडल सचिव एस.बी .पाटील, सदिच्छा भेट देणार आहेत. रक्तदान आरोग्य शिबिराकरिता सहकार्य सहयोग करण्याचे आव्हान मंडळ सचिव गणेश सिंह अध्यक्ष डि.के.रवी, कोषाध्यक्ष विश्वास पाटील, उपहार फाऊंडेशनचे पवन जैन, प्रितीताई जैन, मुख्य फाउंडेशनचे मुकुंद गोसावी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here