बोदवड महाविद्यालयाचा वैभव भोंबे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

0
3
कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय बोदवड येथील  वाणिज्य शाखेचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी वैभव भोंबे याने कला सांस्कृतिक समिती एस. एन. डि. टी. महाविद्यालय, जळगाव
 व जिल्हा क्रीडा विभाग जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दूरदृष्य प्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला.
दि. १२ ते १९ जानेवारी २०२२ दरम्यान राष्ट्रीय युवा दिन साप्ताह निमित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व एस. एन. डि. टी. महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील दि. १४ जानेवारी २०२२ रोजी वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लोकशाही बळकटी मध्ये माझी भूमिका,इतिहास माझा मार्गदर्शक, ई-गव्हर्नस उपयुक्तता, शेती देशाचा आर्थिक कणा, साहित्य समाजाचे दिशादर्शक, स्वच्छता हे मिशन नसून अंगिकारायची वृत्ती आहे, स्त्री शक्ती हि आदिशक्ती अशा विविध विषयावर वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील वैभव भोंबे याने शेती देशाचा आर्थिक कणा या विषयावर आपले मत मांडले यामध्ये त्याने अर्थव्यवस्थेमधील शेतीचे स्थान, शेतीची सद्य परिस्थिती, आव्हाने, उत्पादन व उत्पादकता, सेंद्रिय व शाश्वत शेती अशा समग्र पद्धतीने आपल्या विषयाची मांडणी केली.त्याच्या वकृत्वला उपस्थितीतानी दाद दिली व त्याला परीक्षकांनी सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याचे जाहीर केले.
वैभव च्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.  मिठूलालजी  अग्रवाल  उपाध्यक्ष मा. श्री अजयजी  जैन सचिव मा. श्री. विकासजी कोटेचा, ज्येष्ठ संचालक मा. श्री. अँड. प्रकाशचंदजी सुराणा तसेच संस्था पदाधिकारी,  महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांनी विशेष कौतुक केले आहे. सदर स्पर्धेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम  अधिकारी डॉ. अनिल बारी व डॉ.वंदना बडगुजर यांनी मार्गदर्शन केले असे प्रसिद्धीप्रमुख श्री. जितेंद्र शर्मा यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here