बोदवड नगरपंचायत सेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी आनंदा पाटील याचा एकमेव अर्ज दाखल तर राष्ट्रवादी कडून दोन अर्ज

0
81

बोदवड, प्रतिनिधी । आज नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले 17पैकी 9जागा मिळवत एका भाजजपाची जागा सोबत असुन शिवसेनेकडे असुन आज नगरअध्यक्ष पदासाठी एकमेव आनंदा पाटील याचा उमेदवारी अर्ज दाखल झाला तर राष्ट्रवादीला बहुमताचा आकडा पार सुध्दा करता आला नसून अवघ्या सात जागा राखता आल्या आहे तरी जफर शेख व योगिता खेवलकर यादोघाचा उमेदवारी अर्ज राष्ट्रवादीकडून दाखल करण्यात आली आहे.

माघारी साठी दि. 17 रोजी 5 वाजेपर्यंत वेळ असुन राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष निवडून ही दि 18 रोजी 12 वाजता पीठासीन अधिकारी रामसिंग सुलाने व सहाय्यक मुख्य अधिकारी आकाश डोईफोडे याच्या समक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडणार त्याच दिवशी उपनगराध्यक्ष याचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल व निवडही तेव्हाच केली जाईल शिवसेनेकडून उपनगराध्यक्ष पदासाठी रेखा संजय गायकवाड व शारदा सुनील बोरसे या दोघांची दावेदारी प्रमुख मानली जाते उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार चंद्रकांत पाटील स्विय सहायक प्रविन चौधरी , शकिल बागवान नगरसेवक हाजी सईद बागवान, नगरसेविका शारदा सुनील बोरसे, माजी गटनेते देवेंद्र खेवलकर, धनराज गंगतिरे,जिवन जाट, शांताराम कोळी, परेश अग्रवाल, अजय पाटील, अक्षय अग्रवाल, मनोज पाटील , देवेश सोनार (वर्मा) , मनोज राजपूत यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here