बॉक्स ऑफ हेल्पतर्फे उद्या मंगळवारी भव्य आरेाग्य तपासणी शिबिर

0
2

जळगाव, प्रतिनिधी I येथील बॉक्स ऑफ हेल्पच्या संस्थापिका सुधाताई काबरा यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या मंगळवार दि 11 जानेवारी रोजी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे . सदर आरोग्य तपासणी शिबीर शहरातील खंडेराव नगर, पिंप्राळा परिसरात होणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

शिबीरात नागरिकांची, महिलांची आरोग्य तपासणी, डोळे तपासणी, रक्त- लघवी तपासणी, फिजोथेरेपी, बालरेाग तपासणी, दात तपासणी, ॲक्यूप्रेशन तपासणी आदी तपासण्या सकाळ नऊ ते बारा दरम्यान होणार आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्षा सौ.काबरा यांनी केले आहे.

शिबीरात स्त्रीरोग तज्ञ डॉ.माधूरी कासट, डॉ. हेमांगी कोल्हे, बालरोग तज्ञ डॉ.मनिषा कोल्हे, डॉ.प्रितम पवार, नेत्ररोग तज्ञ डॉ. रशमी पाटील, दंत रोग तज्ञ डॉ.सुयोग सोमाणी, रक्त तपासणी डॉ.ज्ञानेश्‍वर पाटील, एनपीटी निरो सर्जनप-डॉ.निखील पाटील, ॲक्यूप्रेशन डॉ.अविनाश सोनगीकर, मुळव्याध तज्ञ डॉ.मनोज पाटील, डॉ.अपर्णा मकासरे, आर्थोपेडीक तज्ञ डॉ.अजय सोनवणे आदी वैद्यकीयतज्ञ रुग्णांची तपासणी करतील. यावेळी नागरिकांना मोफत सॅनिटायझर, मास्क वाटप करण्यात येणार आहे. बॉक्स ऑफ हेल्प च्या सर्व सदस्यांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here