धरणगाव: जिल्हा प्रतिनिधी
धरणगाव शहरात सहा व आठ वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज शहरात प्रचंड निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मोर्चाच्या वतीने धरणगाव पोलीस निरीक्षक श्री. शेळके व नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
मोर्चाची सुरुवात धरणगाव येथील बालाजी मंदिरापासून कोड बाजार, परीहार चौक व शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ विसर्जन करण्यात आले. मोर्चामध्ये धरणगाव शहरातील सर्व जाती धर्माचे महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चाला सुरुवात सकाळी नऊ वाजता झाली व अकरा वाजता मोर्चाचे विसर्जन करण्यात आले तसेच आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी म्हणून मोर्चाच्या वतीने प्रशासनाकडे मागणी करण्यात आली. या मोर्चाचे नेतृत्व माजी नगराध्यक्ष उषा वाघ, पुष्पा महाजन, प्रा. कविता महाजन, हफीमा मॅडम, ज्योती मॅडम आदींनी केले. त्यांनी या घटनेचा निषेध करून आरोपीस फाशी देण्याची मागणी केली.
मोर्चामध्ये धरणगाव तालुका इंदिरा काँग्रेसचे अध्यक्ष रतिलाल नाना चौधरी, ॲड. महेंद्र चौधरी, डी. जी. पाटील, गुलाबराव वाघ, भानुदास विसावे, डॉ. मिलिंद दहाडे, ॲड. शरद माळी, पी.एम. पाटील, कैलास माळी सर, ॲड. वसंतराव भोलाणे, कडू महाजन, ॲड.शिरिषआप्पा बयस, संजय महाजन, सुनील चौधरी, दीपक चौधरी, निलेश चौधरी, तेली समाजाचे अध्यक्ष नितीन चौधरी, भाजपाचे शहराध्यक्ष शरद महाजन, नगरसेवक ललित वाणी, शरदअण्णा कंखरे, महिला व पुरुष हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.